अजित डोभाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न

मुंबई – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एक संशयित घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षारक्षकांनी या संशयिताला पकडले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याच्या शरीरात एक चिप आहे, ती रिमोटने नियंत्रित केली जात आहे. तपासात तो कर्नाटकचा रहिवासी असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७:४५च्या सुमारास त्या व्यक्तीने अजित डोभाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाºयांनी योग्य वेळी त्या व्यक्तीला थांबवून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समजते. सध्या चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडल्यानंतर तो माणूस थोडा बडबडत होता. त्याच्या शरीरात कोणीतरी चिप घातली असून, ती रिमोटने नियंत्रित केली जात असल्याचे तो सांगत होता. मात्र, तपासात त्याच्या शरीरातून कोणतीही चिप सापडलेली नाही.

ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बंगळुरू येथील रहिवासी आहे. शांतनु रेड्डी असे व्यक्तीचे नाव सांगण्यात आले आहे. नोएडाहून लाल रंगाची एसयूव्ही कार भाड्याने घेऊन तो डोभाल यांच्या घरी पोहोचला होता. रेड्डी कारमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला. सध्या पोलीस रेड्डीचा तिथे येण्यामागचा हेतू काय होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

ल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एक संशयित घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षारक्षकांनी या संशयिताला पकडले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याच्या शरीरात एक चिप आहे, ती रिमोटने नियंत्रित केली जात आहे. तपासात तो कर्नाटकचा रहिवासी असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७:४५च्या सुमारास त्या व्यक्तीने अजित डोभाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाºयांनी योग्य वेळी त्या व्यक्तीला थांबवून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समजते. सध्या चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडल्यानंतर तो माणूस थोडा बडबडत होता. त्याच्या शरीरात कोणीतरी चिप घातली असून, ती रिमोटने नियंत्रित केली जात असल्याचे तो सांगत होता. मात्र, तपासात त्याच्या शरीरातून कोणतीही चिप सापडलेली नाही.

ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बंगळुरू येथील रहिवासी आहे. शांतनु रेड्डी असे व्यक्तीचे नाव सांगण्यात आले आहे. नोएडाहून लाल रंगाची एसयूव्ही कार भाड्याने घेऊन तो डोभाल यांच्या घरी पोहोचला होता. रेड्डी कारमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला. सध्या पोलीस रेड्डीचा तिथे येण्यामागचा हेतू काय होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …