अजिंक्य रहाणे सन्मानित

मुंबई – मुंबई क्रिकेट संघा(एमसीए)चे अध्यक्ष विजय पाटील यांनी गुरुवारी भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला राज्य संघटनेच्या वांद्रे-कुर्ला संकुला(बीकेसी)मध्ये सन्मानित केले. अजिंक्य रहाणे न्यूझीलंडविरोधात कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषविणार आहे. तो भारताच्या कसोटी तज्ज्ञांच्या सराव शिबिरात सोमवारपासून येथे कसून मेहनत घेत आहे. विजय पाटील यांनी जगदीश आचरेकर (कोषाध्यक्ष), नदीम मेमन आणि अजिंक्य नाईक (एमसीएच्या प्रमुख समितीचे सदस्य) आणि मुंबईचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्या उपस्थितीत बीकेसीमध्ये अजिंक्य रहाणेला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी पाटील यांनी पुढील महिन्यात त्रिवेंदम येथे होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी आधी येथे सराव करीत असलेल्या मुंबईच्या वरिष्ठ संघाशीही बाचचित केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …