अजिंक्य रहाणे म्हणतो, …म्हणजेच योगदान नव्हे

कानपूर – अजिंक्य रहाणेला आपल्या खराब फॉर्मशी निगडीत प्रश्न विचारल्यानंतर खूप वाईट वाटले, ज्यावर तो म्हणाला की, माझ्या फॉर्मबाबतच्या चिंता यांना कोणताच आधार नाही व योगदान म्हणजे प्रत्येक सामन्यात शतक झळकावणे असे होत नाही. अजिंक्यने यावर्षी ११ कसोटी सामन्यांत १९च्या सरासरीने धावा केल्या. त्याच्यावर दबाव दिसत असून तो म्हणाला की, एक विशेषज्ज्ञ अव्वल क्रमवारीत फलंदाजाद्वारे साकारलेल्या ३०, ४० वा ५० धावा देखील योगदान असेल, अट हिच संघाचा विजय व्हावा. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी अजिंक्य म्हणाला की, आपल्या फॉर्मबाबत चिंतेत नाही. माझे काम संघाच्या विजयात जेवढे योगदान देता येईल तेवढे देणे आहे. योगदानाचा अर्थ हा नाही की, प्रत्येकाने सामन्यात शतक झळकावणे गरजेचे आहे. अनेकवेळा डावातील ३०, ४०, ५० धावा देखील महत्त्वपूर्ण योगदान देतात. भविष्याबाबत अजिंक्यचे विचार होते की, जे होईल ते होईल. तो म्हणाला की, भविष्यात काय व्हायचे आहे, मी त्याबाबत जास्त चिंतेत नाही. भविष्यात जे व्हायचे आहे, ते होणारच व मला वर्तमानात कायम राहण्याची गरज आहे, जेणेकरून मी आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकेन. हे विचारल्यावर की, फलंदाजी व नेतृत्वाला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची शक्यता आहे का? तर तो म्हणाला, जेव्हा मी फलंदाजी करत असतो तेव्हा माझे लक्ष फक्त फलंदाजीवर असते व मी त्याच क्षणाचा आनंद घेतो. हे तेवढेच सरळ आहे. जेव्हा मी क्षेत्ररक्षण करत असतो, तेव्हा मी त्याबाबतच विचार करतो. कानपूर सामन्यातील हंगामी कर्णधार पुढे म्हणाला, नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मला अनेक विशेष धडे दिले नाहीत, तर त्या गोष्टींना सरळ राखण्यास म्हणाले, कारण त्यांच्या मते मी खूप अनुभवी आहे.
अजिंक्य म्हणतो, राहुल भाई यांनी आम्हीला आपल्या बळकट पक्षांना पाठिंबा देणे व गोष्टी सरळ ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, जास्त चिंता करू नका. त्यांनी मला व पुजाराला म्हटले की, आपल्याला आपल्या योजना माहीत आहेत व आम्ही खूप वर्षांनी खेळत आहोत. त्यामुळे स्वत:ला पाठिंबा देणे महत्त्वाचे राहिल. आम्ही जास्त चिंतेत नाही. अजिंक्य खेळपट्टीबाबत म्हणाला की, खेळपट्टीची वागणूक कशीही असली, तरी आमचा संघ अनुकूल कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. तो पुढे म्हणाला, हो, आमचा संघ आनंदी आहे. मला नाही ठाऊक की, खेळपट्टी कशाप्रकारे रंग दाखवेल. आम्हाला परिस्थितीनुसार खेळावे लागेल. के. एल. राहुल जायबंद झाल्याने श्रेयस अय्यरसाठी संघात जागा बनवण्याचे दरवाजे खुल्ले झालेत, जो आपला पहिला कसोटी सामना खेळणार, पण भारतीय कर्णधाराने हा खुलासा करण्यास नकार दिला की, तिसरा फिरकीपटू व दुसरा वेगवान गोलंदाज कोण असेल. स्पिन विभागात अक्षर पटेलने सराव केला नाही; पण जयंत यादव नेट सत्रात चांगल्या लयात दिसला. अजिंक्यने स्पष्ट केले की, हो, श्रेयस कसोटीत पदार्पण करेल. राहुल संघात नसणे निश्चितपणे मोठा धक्का आहे. त्याने स्पष्ट केले की, सलामी फलंदाज मयंक अग्रवाल व शुभमन गिलवर आपणास पूर्ण विश्वास आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …