अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या बहुचर्चित मे-डे या चित्रपटाचे टायटल प्रदर्शनापूर्वी बदलण्यात आले असून आता हा चित्रपट रनवे 34 या नावाने प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षी 29 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.
या चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टरवर अजय देवगण, अमिताभ बच्चन व रकुल प्रीत सिंगच्या व्यक्तीरेखा दाखवण्यात आल्या आहेत. अजय व रकुल या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. अजयच्या वतीने जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की रनवे 34 हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. हा एक इमोशनल आणि हाय ऑक्टेन थ्रिलर चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेचा अधिक उलगडा न करता मी इतकेच सांगेन की कोणाच्या तरी बोलण्याने मला हा चित्रपट बनवण्यास प्रेरित केले आहे. आपले डोळे बंद करा आणि विचार करा. आम्ही सर्वांनी आयुष्यात अशा गोष्टीचा सामना केला असेल जेव्हा एका क्षणी आपल्याला वाटते की आपण खूब शक्तीशाली आहोत आणि दुसऱ्याच क्षणी वाटते की आपण किती कमजोर आहोत. आपण सर्वच अशा परिस्थितीतून गेलो आहोत की एका क्षणी वाटते की जग जिंकले तर दुसऱ्या क्षणी वाटते की सर्व काही गमावले आहे. आत चाललेले वादळ भावनांशी खेळते. आपल्याला छिन्न-विछिन्न करुन सोडते. ती अवघड राईड आपल्याला विचार करण्यास भाग पाडते की हे वाईट स्वप्न आहे ? की सत्य आहे? रनवे 34 बरोबर अशाच काही भावना जोडल्या गेल्या आहेत. स्क्रिन प्ले मध्ये उत्सव निराशा दोन्हीही आहेत. ईमानदारीने सांगायचे तर ही स्क्रप्टि जाऊ देणे माझ्याकरिता बिल्कुल शक्य नव्हते. मला ठाऊक होते की हा चित्रपट बनवायचा आहे. या अडचणींनी भरलेल्या प्रवासाला निश्चित रुप देताना मला खूप चांगल्या क्रू ची साथ मिळाली. लवकरच दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर करेन. ‘
मे-डे हा अजयच्या करीअरमधील तिसरा चित्रपट आहे जो तो दिग्दर्शित करत आहे. त्याने 2008 मध्ये आलेल्या यू मी और हमद्वारे दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. अजयच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला दुसरा चित्रपट शिवाय आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …