ठळक बातम्या

अजयच्या स्वरातील ‘मळवट’ गोंधळ लोकप्रियतेच्या शिखरावर

अल्पावधीतच ओलांडला १५ लाखांचा टप्पा
नवरात्रीच्या मुहूर्तावर आलेला अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘मळवट’ हा ‘सोयरीक’या आगामी मराठी चित्रपटातील गोंधळ रसिकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.‘अदिती म्युझिककंपनी’च्या वतीने प्रदर्शित झालेल्या ‘मळवट’ च्या गोंधळाने अल्पावधीतच १५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यल्लमा देवीचा जागर या गाण्यातून करण्यात आला आहे. हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून संगीतकार विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केला आहे. या गोंधळाला मिळालेल्या यशाबद्दल अदिती म्युझिकचे सर्वेसर्वा विजय शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. या यशाचा आनंद ‘सोयरीक’ चित्रपटाच्या टीमने केक कापून साजरा केला.

मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.‘नार्इंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या कौटुंबिक धाटणीच्या या मनोरंजक चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *