अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; भारताची लष्करी ताकद वाढली

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची चाचणी बुधवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी करण्यात आली. अग्नी-५ची क्षमता आणि अचूकता ही अन्य क्षेपणास्त्राच्या तुलनेत अधिक असणार आहे, मात्र ही चाचणी संरक्षण सिद्धतेत वाढ करण्यासाठी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अग्नी-५ क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत चीनने चिंता व्यक्त केली होती. अग्नी-५ बॅलेस्टिक मिसाइलमध्ये लेव्हल ३ इंधन इंजिन आहे. ५ हजार किलोमीटर रेंजमध्ये अचूक असे लक्ष्य वेधण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. यामुळे चीनला एकप्रकारे इशाराच देण्यात आला आहे.
भारताच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जमिनीवरून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. अग्नी-५ची चाचणी देशाला संरक्षणाच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. इंटर काँटिनेन्टल बॅलेस्टिक मिसाईल हे जगातील काही देशांकडे आहे. यामध्ये रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्रायल, ब्रिटन, चीन, उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. आता यानंतर भारतसुद्धा इंटर काँटिनेन्टल बॅलेस्टिक मिसाइल असलेला ८ वा देश ठरला आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …