अखेर शाळांची घंटा वाजली

– मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची सुरुवात

– ठाण्यात विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत
मुंबई/ठाणे – मुंबईतल्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते सातवीचे वर्ग बुधवारपासूनच सुरू झाले. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पालिकेच्या शाळाही सुरू झाल्या; पण दुसरीकडे, कॉन्व्हेंट व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा अद्यापही ऑनलाइन शिक्षणावर जोर आहे. इंग्रजी व कॉन्व्हेंट शाळा नाताळच्या सुट्टीनंतर मुलांना शाळेत बोलावण्याचा विचार करत आहेत. ठाण्यात वेगळा उत्साह पाहण्यास मिळाला. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल शाळेत गेटवरच मुलींचे जोरदार स्वागत करण्यात आले.

तसे पाहता, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या ३ हजार ४२० आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडेदहा लाख इतकी आहे. महापालिकेने बुधवारपासून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आलेली. त्याप्रमाणे मराठी माध्यमाच्या काही खासगी शाळाही बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन या व्हेरिएंटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होतील की नाही, अशी सांशकताही पालकांमध्ये व्यक्त केली जात होती. मुंबई महापालिकेने शाळा १५ डिसेंबरपासूनच सुरू करणार असल्याचे सांगितल्यानंतर शाळांनी पालकांना मेसेज पाठवले. ऐनवेळी शाळा सुरू होणार असल्याचे मेसेज मिळाल्याने पालकांमध्ये नाराजी दिसून आली. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे.
मुंबईप्रमाणे ठाण्यातही पालकांच्या सहमती पत्रानंतरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. बँडबाजा वाजवत मुलांचे शाळेत स्वागत करण्यात आले. राज्य सरकार शाळा सुरू करण्यासाठी सर्व शाळा व्यवस्थापकांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश तर देत आहेच. मात्र, या आदेशाचे प्रत्यक्षात पालन होत आहे का? याच्यावरही आता राज्य सरकार लक्ष देणार आहे. अशाप्रकारे कमी क्षमतेने शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आले आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …