ठळक बातम्या

अखेर ‘मन्नत’ पूर्ण; २७ दिवसांनंतर आर्यन खान परतला घरी

मुंबई – मुंबईतील क्रूझ ड्र्ग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खान याची अखेर मुक्तता झाली आहे. तब्बल दिवसांनंतर आर्यन सकाळी ११ च्या सुमारास तुरुंगातून बाहेर आला.मन्नतवर त्याचे जोरदार स्वागत झाले. यावेळी आर्थर रोड तुरुंगाबाहेर शाहरूख खानच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दीझाली होती. तर शाहरुखही सकाळी आर्थर रोड तुरुंगामध्येआला होता. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीनेधाड टाकली होती. त्यावेळी एनसीबीनेआर्यनला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती.
आर्यन खानच्या अटकेनंतर राज्यासह मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अमली पदार्थ प्रकरणात आर्यन २७ दिवस कारागृहात होता. गुरुवारी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळं शुक्रवारची रात्र आर्यनला तुरुंगात काढावी लागली होती. मात्र, आज शनिवारी आर्यनच्या जामीनाची प्रत आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत ठेवण्यात आलं होतं. शनिवारी पहाटेआर्थर रोड कारागृहातील अधिकाऱ्यांनी जामीन पेटी उघडली. त्यानंतर ९ वाजता आर्यनच्या जामीनावरील प्रक्रिया सुरू झाली. जवळपास १०. ३० च्या सुमारास आर्यनच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानुसार ११ वाजता आर्यनला सोडण्यात आले. आर्यन खानला आणण्यासाठी अभिनेता शाहरुख खानही कारागृहाबाहेर पोहोचला होता. आर्यनची सुटका होताच शाहरुखचे अंगरक्षक तिथे दाखल होते. अंगरक्षकांसोबत आर्यन मन्नत बंगल्याकडे रवाना झाला.  दरम्यान, आर्यनच्या सुटकेनंतर शाहरुख खानचे निवासस्थान असलेल्या मन्नतबाहेर जल्लोषाचे वातावरण होते. शाहरुखचे अनेक चाहत्यांनी मन्नत बाहेर गर्दी केली होती. तर, मन्नतला रोषणाई देखील करण्यात आली आहे. तसंच, शाहरुख व आर्यनचा मित्रपरिवारदेखील मन्नतवर उपस्थित होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …