अखेर दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

पुणे – ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. अशात शहरात वीस दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागरिकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आफ्रिकेतून आलेल्या या प्रवाशावर महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले होते. त्या नागरिकाला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सद्यस्थितीला या नागरिकाचा केवळ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, मात्र त्यात नवीन ओमिक्रॉन विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करावे लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. फक्त दक्षिण आफ्रिकेतीलच नव्हे, तर हाँगकाँग, ऑस्ट्रिया, झिम्बाब्वे, जर्मनी, इस्त्रायल यांसारख्या देशातून शहरात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम महानगरपालिकेने सुरू केले आहे. ओमिक्रॉन विषाणूचा वाढत धोका लक्षात घेत महापालिकेकडून ही खबरदारी घेतली जात आहे. यासाठी विमानतळ प्रशासनाकडून पुण्यात या देशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे. विषाणू आढळलेल्या देशांतून पुण्यात येण्यासाठी थेट हवाई वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागरिक शहरात परतले आहेत, त्याची माहिती जमवण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सद्यस्थितीला शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आता असली, तरी दिवाळीनंतर या संख्येत वाढ झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …