ठळक बातम्या

अकोल्यातील अकोटमध्ये संचारबंदीत वाढ

  •  २१ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद
  •  अमरावतीतील इंटरनेट पूर्ववत

अकोला – मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांत तणावाचे वातावरण आहे. या शहरांतील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून संचारबंदी तसेच इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला. आता अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये रविवारपर्यंत संचराबंदी वाढवण्यात आली आहे, तसेच या भागातील इंटरनेट सुविधा रविवारपर्यंत म्हणजेच २१ नोव्हेंबरपर्यंत बंदच राहील.

त्रिपुरा राज्यातील कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. येथे अमरावती, मालेगाव, नांदेडसारख्या शहरांत हिंसाचार, दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर संवेदनशील शहरात पोलिसांकडून संचारबंदी लागू केली गेली. १२ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील एका भागात दगडफेकीची घटना समोर आली होती. तेव्हापासून अकोटमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. आता हीच संचारबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, तसेच यापूर्वी प्रशासनाने १३ व १४ नोव्हेंबर अशा दोन दिवसांसाठी २४ तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत संचारबंदीत वाढ केली होती. नंतर हीच संचारबंदी १९ नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारपर्यंत वाढविण्यात आली. आता संचारबंदीत पुन्हा एकदा २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या काळात शहरातील इंटरनेट सेवा बंदच असेल.

  •  अमरावतीतील इंटरनेट सेवा पूर्ववत

अमरावतीतही समाजकंटकांनी तोडफोड आणि दगडफेकी केल्या. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हिंसाचाराच्या घटनेला ६ दिवस पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचा आढावे घेत शुक्रवारी शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …