परळी – बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी-वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसापूर्वीधमकीचेपत्र मिळालेहोते. आता पुन्हा एकदा अंबेजोगाईतील मंदिरालाही धमकीचेपत्र आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दोन दिवसापूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला ५० लाख रुपयांची मागणी करणारेपत्र मिळाले होते. आता दुसरेधमकी पत्र बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचेश्रद्धास्थान अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने देखील अशाच पद्धतीचेधमकीचं पत्र आलेआहे. विशेष म्हणजेया दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे. योगेश्वरी देवस्थान कमिटीच्या नावानेआलेल्या पत्रामध्ये ५० लाख रुपये द्या नाही, तर मंदिर आरडीएक्सनेउडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. पत्र प्राप्त होताच मंदिर कमिटीनेपोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. हेपत्र कोणी पाठवलं याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बीडमधील दुसऱ्या मंदिराला हेपत्र आल्यानेआता खळबळ उडाली आहे.
वैद्यनाथ मंदीर धमकी प्रकरणी दोघांना घेतले ताब्यात
पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत नांदेड येथील पोलिसांनी पत्रातील विष्णुपुरी,पत्यावरून नांदेड येथील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून यातील एक व्यक्ती विमा प्रतिनिधी तर दुसरा बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. मात्र आम्हाला या प्रकरणात गोवलेअसून आमचा एका व्यक्तीसोबत वाद चालू आहे, दोन दिवसावर आमची कोर्टाची तारीख आलेली आहे.ज्या व्यक्तीसोबत आमचा वाद आहे त्यानेच हा खोडसाळपणा केल्याचा आरोप ताब्यातील दोघांनी केला असून नांदेड पोलीस याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.