सचिनने शेअर केला भन्नाट व्हिडीओ
मुंबई – क्रिकेट मॅचमध्ये अंपायरची भूमिका नेहमी महत्त्वाची ठरते. बॉलरने बॉल टाकल्यानंतर आणि अपील केल्यानंतर अंपायर काय निर्णय देतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्याचबरोबर खराब अंपायरिंगमुळे अनेक खेळाडू आणि संघ निराश झाले आहेत, तर क्रिकेट खेळादरम्यान अंपायरच्या निर्णयामुळेही अनेक सामन्यांचे निर्णय बदलण्यास मदत झाली आहे. अशातच एका मजेशीर अंपायरची चर्चा सध्या क्रिकेट जगतात रंगली आहे. डोक्यावर उभा राहून पायाने वाइडचा इशारा देणाऱ्या अंपायरचा भन्नाट व्हिडीओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेअर केला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धा पुरंदर प्रीमियर लीगमध्ये हा भन्नाट किस्सा घडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंपायर त्याच्या डोक्यावर उभा राहून पायाने वाइडचा इशारा देताना दिसत आहे. अंपायरचा हा अनोखा अंदाच पाहून सचिनसह इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही चक्रावला आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी अंपायर सहसा हातांनी इशारा करत असतात. पुरंदर प्रीमियर लीगमध्ये अंपायरची अनोखी स्टाइल पाहायला मिळाली. सचिनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे आणि आंतरराष्ट्रीय पंच बिली बाऊडेन यांना टॅग करून त्यांचे मतही विचारले आहे. तर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही महाराष्ट्राच्या या अंपायरवर आश्चर्यचकित झाला होता. त्याने हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला. नक्कीच आम्हाला या माणसाला आससीसीच्या एलिट पॅनेलमध्ये सामील होताना पाहायचे आहे, असे कॅप्शन वॉनने या व्हिडीओला दिले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …