ठळक बातम्या

अंध पतीला पत्नीनेच घातला लाखोंचा गंडा

पुणे – येथील एका अंध व्यक्तीची तब्बल ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अंध व्यक्तीशी लग्न करणाऱ्या महिलेने आणि लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थींनी ही फसवणूक केल्याचे कळते. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पत्नी घरातील दागिने आणि पैसे घेऊन फरारी झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विनोद केसाराम चौधरी असे ३० वर्षीय फिर्यादीचे नाव असून, ते विमाननगर परिसरातील रेशमा रिव्हेरा सोसायटीतील रहिवासी आहेत. फिर्यादी चौधरी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करतात. दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने त्यांचे लग्न जुळण्यात अनेक अडचणी येत होत्या. अनेक ठिकाणी मुली शोधूनही त्याचे लग्न जुळत नव्हते. दरम्यान, फिर्यादींच्या समाजातील मध्यस्थ कैलासकुमार सिंघवी यांनी विनोद चौधरी यांच्यासाठी सारिका बंब नावाच्या मुलीचे स्थळ आणले, तसेच लग्नासाठी मुलीच्या कुटुंबीयांना पैसे द्यावे लागतील, असे सिंघवी यांनी फिर्यादीस सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने आरोपींना वेळोवेळी ८ लाख ७३ हजार रुपये दिले. आरोपी पत्नी सारिका बंब हिने लग्नानंतर सात महिने फिर्यादीसोबत संसारही केला, पण त्यानंतर आरोपी महिलेने लग्नात दिलेले दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. पत्नी अचानक घरातून गायब झाल्यामुळे फिर्यादी विनोद चौधरी यांनी पत्नी सारिकाला फोन केला. मी थोड्याच दिवसांत परत येते असे आश्वासन पत्नीने दिले. काही दिवस वाट पाहूनही पत्नी आली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा पत्नी सारिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी आरोपी महिलेने आपला फोन बंद करून ठेवला होता. संबंधित महिलेचे आधारकार्ड तपासले असता, तेही बनावट निघाले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकार जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ दरम्यान घडला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …