‘अंडर-१९’ : पहिल्या सामन्यात भारत विजयी

यजमान युएई संघ पराभूत
दुबई – हरनूर सिंगचे शतक आणि गोलंदाजांची शानदार कामगिरी या बळावर भारताने गुरुवारी अंडर-१९ आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमीरात (युएई) संघाला १५४ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजीसाठी पाठविण्यात आलेल्या भारतीय टीमने पाच विकेट्स वर २८२ धावा केल्या. हरनूरने १३० चेंडूंमध्ये १२० धावा केल्या, तर कर्णधार यश धुल याने ६८ चेंडूंमध्ये ६३ धावांची भर घातली. राजवर्धन हंगर्गेकरने २३ चेंडूंत नाबाद ४८ धावा काढल्या. युएई संघाने नऊ गोलंदाजांना अजमावून पाहिले, परंतु ते भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखू शकले नाहीत. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला यजमान युएई संघ ३४.३ षटकांमध्ये १२८ धावांवर सर्वबाद झाला. हंगर्गेकरने तीन बळी घेतले तर गर्व सांगवान, विकी ओसवाल आणि कौशल तांबळे यांनी प्रत्येकी दोने विकेट घेतल्या. भारताचा मुकाबला आता शनिवारी पाकिस्तानशी होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …