अंडर १९ आशियाईचषक : भारत संघाची निवड


* महाराष्ट्राच्या तांबे, हंगरगेकरला संधी
* दिल्लीचा यश धुल संघाचा कर्णधार
नवी दिल्ली – आशिया अंडर-१९ चषक स्पर्धेला येत्या २३ डिसेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ज्युनियर क्रिकेट निवड समितीतीतर्फेभारतीय संघातील २० खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली.यासह पाच राखीव खेळाडूंचाही समावेश करण्यात आलाय. संघाचेनेतृत्व दिल्लीचा धडाकेबाज क्रिकेटपटू यश धूलकडेसोपवले आहे. या संघात महाराष्ट्रातील कौशल तांबेआणि राजवर्धन हंगरगेकर याचाही २० खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू म्हणून हंगरगेकर ची निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयनेएक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात म्हटले की, यूएईला जाण्यापूर्वी ह्या सगळ्यांना बंगळुरुत नॅशनल क्रिकेट अकादमीत स्वत:ला सिद्धही करावेलागेल. म्हणजेच ह्या अकादमीत आशियाईचषकाच्या तयारीचा कँप लागणार आहे. त्यामुळेच त्यासाठी २५ क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली. त्यातलेपाच हे स्टँडबाय असतील. दरम्यान, ११ ते १९ डिसेंबरपर्यंत ही सराव शिबीर पार पडणार आहे. २०२२ च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धाहोणार आहे. यापार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धा महत्वाची ठरणार आहे.
एशिया कपचा कर्णधार म्हणून दिल्लीचा यश धुलच का? तर त्याचं उत्तर आहे त्याची अलिकडची कामगिरी. त्यानेविनोद मंकड ट्रॉफित यावर्षी सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. दिल्लीकडून त्याने ७५.५० च्या सरासरीने३०२ धावा ओढल्यात. त्यामुळेच यश धुल हीच योग्य निवड असल्याची चर्चाआहे. आशिया चषकासाठी अंडर-१९ ची घोषणा केली असली तरीसुद्धा वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर-१९ विश्व चषकासाठीच्या संघाची घोषणा मात्र नंतर होणार असल्याची बीसीसीआयने स्पष्ट केले. पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीत हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. आतापर्यंत आठ आशिया चषक स्पर्धाखेळवल्या गेल्या आहेत. त्यापैकी भारताने६ वेळा विजय मिळवला, तर २०१२ साली भारतानेपाकिस्तानसोबत ट्रॉफी शेअर केली होती.
अंडर-१९ आशियाईचषक संघ-हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एस.के. राशिद, यश धुल (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधु, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्टीरक्षक), राजंगद बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवान, रवि कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारेख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासु वत्स.
राखीव खेळाडूंची यादी ० आयुष सिंग ठाकूर, उदय सहारन, शाश्वत डंगवाल, धनुष गौडा, पीएम सिंह राठोड.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …