अंग लगा दे रे, मोहे रंग लगा दे रे…


अभिनेत्री अनन्या पांडेची कझिन अलाना पांडे सध्या आपल्या एंगेजमेंटमुळे चर्चेत आहे. अलाना पांडेने आता आपला फियोन्से आयव्हर मॅक्रेसोबतचे अत्यंत रोमॅँटीक आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाईलवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत अलाना पांडे ही आपला फियोन्से आयव्हर मॅक्रे सोबत खूप बोल्ड रोमान्स करताना दिसून येत आहे. हे कपल कधी पूलमध्ये तर कधी समुद्राकिनारी एकमेकांच्या बाहुपाशात दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये अलानाने आपल्या मॅनसोबतचा दोन वर्षांचा प्रवास दाखवला आहे.
अलिकडेच सोशल मिडियावर काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यात आयव्हर हा अलानाला प्रपोझ करताना दिसून आला होता. आपल्या आयुष्यातील हे क्षण खास बनवण्यासाठी त्यांनी इतक्या मोठ्या लेव्हलवर हे शूट करुन घेतले आहे. अलानाने वाङनिश्चयाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले,’ आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न करत आहे. तर अन्य एका पोस्टमध्ये अलानाने लिहिले आहे,’ जोपर्यंत मी तुला भेटले नव्हते तोपर्यंत मी कोणत्याही व्यक्तीवर इतके प्रेम करण्याचा विचारही केला नव्हता.’ तसे पहायला गेले तर अलाना ही आपल्या बोल्डनेस मुळे नेहमीच चर्चेत असते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …