अँडरसनने बॅटिंगमध्ये केला ऐतिहासिक विक्रम

ॲडलेड – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये कांगारूंचे पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ४७३/९ वर घोषित केला. त्यानंतर इंग्लंडचा संघ २३६ धावांवर सर्वबाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर ४५ धावा इतकी झाली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी २८२ धावांपर्यंत पोहोचली. दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली, पण इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने असा विक्रम केला, जो मोडणे अशक्य आहे. अँडरसनने हा विक्रम चेंडूने नाही, तर बॅटने केला. अँडरसन क्रिकेट इतिहासातला पहिला खेळाडू बनला आहे, जो १०० वेळा नाबाद राहत पॅव्हेलियनमध्ये परतला. अँडरसनची ही १६७ वी कसोटी आहे. अँडरसनचा हा विक्रम मोडला जाणे जवळपास अशक्यच आहे. अँडरसन पहिल्या डावामध्ये १३ चेंडूंमध्ये पाच धावांवर नाबाद राहिला. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉल्श त्याच्या करिअरमध्ये ६१ वेळा नाबाद राहिला, तर मुथय्या मुरलीधरन ५६ वेळा आणि बॉब विल्स ५५ वेळा नाबाद राहिले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …