Tokyo Paralympics: अवनी लेखराने रचला इतिहास; एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ठरली पहिली भारतीय

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे.


Tokyo Paralympics: अवनी लेखराने रचला इतिहास; एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ठरली पहिली भारतीय

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या. पात्रता फेरीत अवनी लेखरा ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात बारावं पदक आलं आहे. भारताला या स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदक मिळाली आहे. भारताचा पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. रियो पॅरालिम्पिक (२०१६) स्पर्धेत भारताने २ सुवर्ण पदकांसह ४ पदकं जिंकली होती.

भारताच्या अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले होतं. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

About admin

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …

Leave a Reply

Your email address will not be published.