ठळक बातम्या

उमेश यादवचा फटका बघून गावसकरांना आठवला मुंबईचा ‘बनाटी शॉट’!

भारताची वरची फळी गारद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर-उमेश यादव यांनी झुंजार भागीदारी रचली.

भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरनं चांगली फटकेबाजी करत आपला इरादा स्पष्ट केला. त्याच्या पावलावर पाउल टाकत उमेश यादवनंही जोरदार फटका मारायचा प्रयत्न केला. धाव एकही मिळाली नाही पण तो फटका बघून समालोचन करणाऱ्या सुनील गावसकरांना फक्त मुंबईत वर्णला जाणारा बनाटी शॉट आठवला.

गावसकर म्हणाले, ”हा फटका बघून मला मुंबईमध्ये वर्णन केलेल्या बनाटी शॉटची आठवण झाली. हे नाव कोणी दिलं, का दिलं माहीत नाही, पण जेव्हा गोलंदाज फलंदाजीला येतो व अशी हाणामारी करायचा प्रयत्न करत बँट फिरवतो तेव्हा त्याला बनाटी शॉट म्हणतात.”

हेही वाचा – ENG vs IND : ‘‘ऐतिहासिक विजय मिळाला तेव्हा कप्तान अजित वाडेकर झोपले होते”, गावसकरांनी सांगितला किस्सा

यावेळी त्यांनी शार्दूल ठाकूरच्या फटकेबाजीचंही कौतुक केलं. शार्दूलनं मारलेल्या एका स्ट्रेट ड्राइव्हचं कौतुक करताना तर गावसकर म्हणाले, ”इतका सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह बघून सचिन तेंडुलकरही खूश होईल.”

शार्दुलची वादळी खेळी
केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी आजपासून सुरू झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला १९१ धावांत गारद केले. आज संधी मिळालेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरचे झटपट अर्धशतक टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ घेऊन गेले. शार्दुलने ३७ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५७ धावा चोपल्या. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी योगदान दिले. दुखापतीतून सावरलेल्या ख्रिस वोक्सने ४ बळी घेत आपले पुनरागमन यशस्वी केले आहे. पाच सामन्यांची ही मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे.

About admin

अवश्य वाचा

सौरव गांगुलींच्या तब्येतीत सुधारणा

कोलकाता – कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागलेले बीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलींच्या प्रकृतीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *