आज शारजाहच्या मैदानावर प्रेक्षकांना चौकार-षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण आयपीएलच्या ३५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)आमनेसामने आले आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ यांच्यातील लढाई पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. शारजाहमध्ये वाळूच्या वादळामुळे नाणेफेकीला उशीर झाला. अपडेटनुसार,नाणेफेकीलाचा कौल धोनीच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने टाकलेल्या पहिल्या षटकात विराट कोहलीने दोन आणि देवदत्त पडिक्कलने एक चौकार ठोकत बंगळुरूला उत्तम सुरुवात करून दिली. विराटने आक्रमक अंदाजात सुरुवात करत चहरसोबत, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजावरही हल्लाबोल केला. ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये या दोघांनी संघासाठी ५५ धावा फलकावर लावल्या.
आजच्या सामन्यासाठी चेन्नईने आपला मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे. तर विराटने आपल्या संघात सिंगापूरच्या टिम डेव्हिडला पदार्पणाची संधी दिली आहे. टी-२० स्पेशालिस्ट आणि मोठे षटकार मारण्यासाठी टिम ओळखला जातो. या दोन्ही संघांची आकडेवारी पाहिली, तर दोघांत चेन्नईचा संघ उजवा असल्याचे समोर आले आहे. चेन्नईने बंगळुविरुद्ध १७ सामने जिंकले आहेत आणि तर ९ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या ११ पैकी ९ सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे.
चेन्नईने गेल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे बंगळूरुला मात्र कोलकाता नाइट रायडर्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अबुधाबी आणि दुबईच्या तुलनेत सीमारेषा जवळ असल्याने शारजामध्ये २०० धावांचे लक्ष्यही कमी पडत असल्याचे गेल्या हंगामात दिसून आले