ॲशेस मालिका: अटीतटीची चौथी कसोटी झाली ‘ड्रॉ’

स्टुअर्ट ब्रॉड – जेम्स अँडरसननेइंग्लंडला तारले

सिडनी – अत्यंत रंगतदार झालेल्या अ­ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड – जेम्स अँडरसन या जोडीनेआपल्या शेवटच्या विकेटचा बचाव करत ऑस्ट्रेलियाचे विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिलेनाही. सिडनीत पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाने ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा इंग्लंडच्या झॅक क्रॉवली आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी बिनबाद ३० अशी मजल मारली, पण पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंड, पॅट कमिन्स यांनी चांगला मारा करत इंग्लंडची वाईट अवस्था केली. शेवटच्या दोन षटकात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड झुंज दिली. या दोघांनी ही दोन्ही १० षटके खेळून काढत सामना ड्रॉ केला. इंग्लंडलाही नशिबाची साथ लाभली. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला.
चौथ्यादिवसाच्या बीन बाद ३० या धावसंख्येवरुन क्रॉवली आणि हमीद यांनी पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला. सकाळच्या सत्रात सलामीवीर हसीब हमीद (९) आणि डेव्हिड मलान (४) यांनी निराशा केली. पॅट कमिन्सच्या चेंडूवर कॅरीने हमीदला जीवदान दिले, पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. ऑफस्पिनर नाथन लायनने आपल्या तिसऱ्या षटकात मलानला बोल्ड करून इंग्लंडची धावसंख्या २ बाद ७४ अशी केली. त्यानंतर क्रॉवली आणि रुटने पाय रोऊन खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र ऑस्ट्रेनियाच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे त्यांना यश आलेनाही. सलामीवीर क्रावलीने १३ चौकारांसह ७७ धावा, तर रुटही २४ धावा करून बाद झाले.बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी दोन्ही डावात शानदार फलंदाजी करत इंग्लंड संघाला सिडनीमध्येसन्मान राखण्यास मदत केली. दुसऱ्या डावात स्टोक्सने ६० आणि बेअरस्टोने ४१ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी ३५८ धावांची गरज होती, पण इंग्लंडला ९ गडी गमावून केवळ २७० धावा करू शकला. सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ ३-० ने आघाडीवर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …