हजारे क्वार्टर फायनल : केरळचा सामना सैन्याशी व विदर्भ भिडणार सौराष्ट्रला

जयपूर – केरळचे पारडे बुधवारी होणाऱ्या विजय हजारे चषक ट्रॉफी क्वार्टर फायनलमध्ये सैन्यावर भारी असेल, तर बरोबरीच्या सामन्यात विदर्भ व सौराष्ट्र आमने-सामने असतील. सौराष्ट्रने थेट अंतिम आठमध्ये जागा मिळवली, तर विदर्भने प्री क्वार्टर फायनलमध्ये त्रिपुराचा पराभव केला. केरळ व सैन्य सरळ क्वार्टर फायनलमध्ये पोहचले होते. फैज फजलच्या नेतृत्वातील विदर्भ संघाला सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मोठी धावसंख्या रचावी लागेल. यासाठी फजलला पुढाकार घ्यावा लागेल, तर फॉर्मात असलेला सलामी फलंदाज अथर्व तायडेदेखील चांगली धावसंख्या करू शकतो. त्याच्याशिवाय गणेश सतीश, यश राठोड, अक्षय वाडकर व अपूर्व वानखेडे यांसारखे फलंदाज संघात आहेत. गोलंदाजांत यश ठाकूर व दर्शन नळकांडेने नव्या चेंडूने व अखेरच्या षटकात चांगली कामगिरी केली. ठाकूरने अद्यापपर्यंत १८ विकेट मिळवलेत. त्याला आदित्य सरवटे व अक्षय वाखरेसारख्या फिरकीपटूंचे सहकार्य मिळेल. दुसरीकडे, लीग गटात अपराजीत राहिलेला सौराष्ट्र विजयासाठी लय कायम राखू पाहिल. शेल्डन जॅक्सन, प्रेरक मांकर, अर्पित वासवडा, समर्थ व्यास, चिराग जानी व यष्टीरक्षक हार्विक देसाईकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत चेतन सकारिया व कर्णधार जयदेव उनाडकटवर साऱ्यांच्या नजरा असतील. दुसऱ्या सामन्यात केरळकडे कर्णधार संजू सॅमसन व सचिन बेबीसारखे शानदार फलंदाज आहेत. फिरकीपटू जलज सक्सेना व एस. जोसेफकडे खूप अनुभव आहे. सैन्याचा संघदेखील बळकट आहे, पण त्यांच्या गोलंदाज व फलंदाजांना केरळसारख्या बळकट संघावर विजय मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावा लागेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेप भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा

३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेप भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण …