संघात निवड न झाल्याने पूनमने व्यक्त केली नाराजी

मुंबई- न्यूझीलंडमध्येहोणाऱ्या महिला विश्वचषकासाठी आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयनेटीम इंडियाची घोषणा झाली आहे. या दोन्ही स्पर्धेसाठी निवडलेल्या संघामधून अनेक दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आलेआहे. यामध्येजेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, अनुभवी बॅटर पूनम राऊत हे प्रमुख नावेआहेत. बोर्डाने संघाची घोषणा केल्यानंतर पूनमने संघामधून वगळल्यानंतर ट्विट करत निराशा व्यक्त केली आहे. टीममधील अनुभवी खेळाडू आणि गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करूनही संघामध्ये निवड न झाल्याने तिने निराशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या ट्विटमध्ये तिने गेल्या वर्षभरातील कामगिरीची आकडेवारी देखील दिली आहे. यानुसार तिने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७३.७५ च्या सरासरीने२९५ धावा काढल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानंतरही टीममध्ये निवड न झाल्याने ती निराश झाली. तरीही तिनं यावेळी टीम इंडियात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …