विश्वचषक आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी महिला टीम इंडियाची घोषणा


स्टार जेमिमा रॉड्रिगेज आणि शिखा पांडेला संघात स्थान नाही
मुंबई- न्यूझीलंडमध्येहोणाऱ्या महिला विश्वचषक २०२२ साठी आणि विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयनेगुरुवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. मिताली राजकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. तर, हरमनप्रीत कौरकडेउपकर्णधाराची जबाबादारी देण्यात आली.तसेच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी-२० सामन्याचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडेकायम ठेवले आहे.
भारतीय टीममध्ये जेमिमा रॉड्रिग्स, शिखा पांडे, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती आणि हरलीन देओल यांना जागा मिळालेली नाही. खराब फॉर्मचे कारण पुढे करत जेमिमा आणि अष्टपैलू शिखा पांडेयांना संघात स्थान दिले नाहीग़ेल्या वर्षात जेमिमाला एकाही सामन्यात मोठी कामगिरी करता आली नाही, परंतु मुंबईकर जेमिमा सध्या जोरदार फॉर्मात आहे. इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत तिने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळेजेमिमाला वगळण्याचा निर्णय सर्वात धक्कादायक मानला जात आहे. तसेच शिखा पांडे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तिनेऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला क्लीन बोल्ड केले होते. या चेंडूची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने तर या चेंडूला महिला क्रिकेटमधील बॉल ऑफ द सेन्चुरी असे म्हटले होते.
महिला विश्वचषकामधील भारताची पहिला सामना ६ मार्च रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या विश्वचषकामध्ये एकूण ८ टीम सहभागी होणार असून सर्व टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. या स्पर्धेची फायनल ३ एप्रिल रोजी होणार आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध एक टी-२० सामन्यासह ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ११ ते २४ फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडमध्येच ही मालिका होईल. या
विश्वचषक आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी महिला टीम : मिताली राज (कर्णधावर), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंह, रेणूका सिंह ठाकूर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.
राखीव खेळाडू : सब्बीनेनी मेघना, एकता बिष्ट आणि सिमरन दिल बहादूर
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेधना सिंह, रेणुका सिंह ठाकुर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एस मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर

भारतीय महिला क्रिकेट संघाचं वेळापत्रक
1) ६ मार्च भारत विरुद्द पाकिस्तान – तौरंगा
2) १० मार्च भारत विरुद्ध न्यूझीलंड -हॅमिल्टन
3) १२ मार्च भारत विरुद्ध वेस्ट इंडीज – हॅमिल्टन
4) १६ मार्च भारत विरुद्ध इंग्लंड – तौरंगा
5) १९ मार्च भारत विरुद्ध ऑकलँड – ऑकलँड
6) २२ मार्च भारत विरुद्ध बांगलादेश – हॅमिल्टन
7) २७ मार्चभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ख्राइस्चर्च

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …