विजय हजारे क्वार्टर फायनल : हिमाचलविरुद्ध उत्तर प्रदेशचे पारडे जड

  • तामिळनाडू-कर्नाटक यांच्यात ‘काटें की टक्कर’

जयपूर – शानदार लयात असलेला उत्तर प्रदेश संघ विजय हजारे ट्रॉफी राष्ट्रीय वनडे स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये हिमाचलविरुद्ध उतरेल, तर कागदावर त्यांचे पारडे जड असेल. दिवसाच्या इतर एका सामन्यात दक्षिण भारतातील दोन बळकट संघ कर्नाटक व तामिळनाडू यांच्यात काटें की टक्कर पाहण्यास मिळू शकते.
हिमाचल व तामिळनाडू यांनी जिथे क्वार्टर फायनलमध्ये थेट प्रवेश केला, तर उत्तर प्रदेशने रविवारी मध्य प्रदेशवर पाच व कर्नाटकने राजस्थानविरुद्ध ८ विकेटने विजय मिळवला. उत्तर प्रदेशला आपला अनुभवी खेळाडू अक्षदीप नाथवर विश्वास असेल, ज्याने मध्य प्रदेशवरील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, नाथला पहिल्या फळीतील सलामी फलंदाज माधव कौशिक, युवा यष्टीरक्षक आर्यन जुयाल, कर्णधार करण शर्मा व समीर रिझवी यांच्याकडून मदतीची गरज असेल. या फलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली, तर हिमाचलच्या गोलंदाजांची स्थिती आव्हानात्मक होईल. उत्तर प्रदेशचा डावखुरा आक्रमक फलंदाज रिंकू सिंहच्या उपस्थितीत आणखीन बळकट झाला आहे. संघातील गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार करत आहे, तर यात अंकित राजपूत, यश दयाल व शिवम मावीने शानदार पद्धतीने त्याला साथ दिली. डावखुरा मंदगती गोलंदाज शिवम शर्माने काही सामन्यात आपली छाप सोडली. तो याही सामन्यात त्याचप्रकारे कामगिरी करू पाहील. हिमाचलची सर्वात मोठी ताकद त्यांचा कर्णधार ऋषी धवन आहे. या गोलंदाज अष्टपैलूने सध्याच्या सत्रात फलंदाजी व गोलंदाजीने योगदान दिले व अंतिम आठमध्ये जागा मिळवण्यासाठी त्याला हिच कामगिरी करावी लागेल. धवनला मात्र पहिल्या फळीकडून चांगल्या मदतीची अपेक्षा असेल, ज्यात यष्टीरक्षक शुभम अरोरा, प्रशांत चोप्रा, निखिल गंगटा व डावखुरा फलंदाज अमित ठाकूर यांचा समावेश आहे. गोलंदाजी विभागात धवनला डावखुरा फिरकीपटू मयंग डागरकडून पुन्हा एकदा चांगली साथ मिळवण्याची अपेक्षा असेल.

राजस्थानला त्यांच्या स्थानिक मैदानात ८ विकेटने पराभूत केल्यानंतर कर्नाटकचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी तामिळनाडूविरुद्ध हिच लय कायम राखू पाहतील. तामिळनाडूचा संघ ही स्पर्धेत चांगल्या लयात आहे. लीग फेरीत त्यांनी कर्नाटकचा पराभव केला होता. कर्नाटकाकडे रविकुमार समर्थ, देवदत्त पडीक्कल, कृष्णमूर्ती सिद्धार्थ, कर्णधार मनिष पांडे, अभिनव मनोहर व कृष्ण गौतमच्या रूपात सर्वोत्कृष्ट फलंदाजी क्रम आहे. हा फलंदाजी चमू कोणत्याही आक्रमणावर चढाई करू शकतो. प्रसिद्ध कृष्णाच्या नेतृत्वात कर्नाटकच्या गोलंदाजी आक्रमणाला तामिळनाडूच्या बळकट गोलंदाजी क्रमाविरुद्ध आपली जबाबदारी बजावावी लागेल. एन. जगदिशन, बी. इंद्रजीत, दिनेश कार्तिक, कर्णधार विजय शंकर, एम. एस. वॉशिंग्टन सुंदर व शाहरूख खानच्या उपस्थितीत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरही दबाव असेल. युवा फलंदाज बी. साई सुदर्शनने आपल्या पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. इंग्लंड दौऱ्यात जायबंद झालेल्या वॉशिंग्टन सुंदरने सध्याच्या सत्रात १२ विकेट मिळवल्या आहेत, पण त्याला फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचा सहकारी स्पिनर आर. साई किशोर, एम. सिद्धार्थ व आर. संजय यादव यांना तामिळनाडूला सेमीफायनलमध्ये पोहचवण्यासाठी घाम गाळावा लागेल. कर्नाटक व तामिळनाडू यांच्यात भूतकाळात काही रोमहर्षक सामने रंगले. ज्यात नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलचा समावेश होता, जिथे शाहरूख खानने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत तामिळनाडूला विजय मिळवून दिला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेप भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा

३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेप भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण …