ठळक बातम्या

विजय हजारे करंडक: मुंबईला तामिळनाडूचे आव्हान

* युवा खेळाडूंना छाप पाडण्याची संधी
मुंबई – आयपीएलच्या आगामी हंगामातील महा लिलावापूर्वी भारताच्या युवा खेळाडूंना विजय हजारे करंडकाच्या माध्यमातून आपली छाप सोडण्याची संधी चालून आली आहे.२०२२ हंगामातील खेळाडूंचा लिलाव जानेवारी महिन्यात होणार असून बुधवारपसून सुरू होणारी एकदिवसीय सामन्यांची विजय हजारे करंडक त्यांच्या कारकीर्दीसाठी महत्त्वाची आहे.
हर्षल पटेल, राहुल चाहर आणि दीपक चाहर या खेळाडूंना आयपीएलमधील संघांनी कायम ठेवलेनाही. या तिघांसोबत अनेक खेळाडूंची यादी मोठी आहे. विजय हजारे करंडकच्या पहिल्या दिवशी गतविजेता मुंबई गट ब मधून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्रिवेंद्रम येथे होणाऱ्या या सामन्यात शम्य मुलानीच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ सय्यद मुश्ताक अली करंडकाचा विजेता तामिळनाडूशी दोन हात करेल. मुंबईच्या संघात यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, सिद्धेश लाड आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचा समावेश आहे. तर, गोलंदाजीची धुरा धवल कुलकर्णी सांभाळताना दिसेल. तामिळनाडूने दिनेश कार्तिक व वॉशिंग्टन सुंदर यांना पुनरामनाची संधी दिली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडकमध्ये या दोघांना विश्रांती देण्यात आली होती.
महाराष्ट्राचा संघ राजकोटमध्ये ड गटात मध्य प्रदेशविरोधात पहिला सामना खेळेल. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने सय्यद मुश्ताक अली करंडकच्या बाद फेरीत धडक मारली होती. गायकवाड सोबत राहुल त्रिपाठी व नौशाद शेख यांच्यावर महाराष्ट्राची भिस्त आहे.
* एलीट गट अ, ब, क, ड, ई गटासोबत प्लेट गटात एकूण ३८ सामने खेळवण्यात येतील. त्रिवेंद्रम, चंदिगड, राजकोट, मुंबई, गुवाहटी, रांची आणि जयपूर या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. बाद फेरीचे सामने २१ डिसेंबरपासून खेळवण्यात येतील, तर अंतिम सामना २७ डिसेंबर रोजी खेळवण्यात येईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

सौरव गांगुलींच्या तब्येतीत सुधारणा

कोलकाता – कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागलेले बीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलींच्या प्रकृतीत …