रहाणे आणि पुजारा विश्वासावर खरे उतरले- सुनील गावस्कर

जोहान्सबर्ग- जोहान्सबर्गकसोटीत टीम इंडिया सात विकेट्सनी पराभूत झाली. या पराभवानंतर माजी दिग्गज खेळाडू गावस्कर यांनी रहाणेआणि पुजारा यांची पाठराखण करत, या दोघांवरही जो विश्वास दाखवण्यात आला त्यावर दोघेही खरे उतरले आहेत, असं म्हणाले. गावस्कर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ शी बोलताना हे वक्तव्य केलं.
भारतीय संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेआणि चेतेश्वर पुजारा खराब पद्धतीने बाद होत नसतील, दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यांनी जी फलंदाजी केली, तसा खेळ दाखवत असतील, तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. दुसऱ्याडावात दोघांनी अर्धशतकी खेळी केल्यानंतर गावस्करांनी आता त्यांची पाठराखण केली आहे. अनुभव आणि याआधी केलेल्या कामगिरीमुळे संघ रहाणे आणि पुजाराच्या पाठिशी उभा राहिला. चांगली कामगिरी करु शकतो, असा विश्वास त्यांच्यामध्ये होता आणि त्यांनी ते करुन दाखवले, असे तेम्हणाले. काही वेळा आपण आपल्या वरिष्ठ खेळाडूंबद्दल कठोर होतो. कारण तरुण खेळाडू तयार असतात, त्यांना देखील संधी मिळावी, असे आपल्याला वाटत असते. पण जो पर्यंत हे वरिष्ठ खेळाडू चांगला खेळ दाखवतात, चुकीच्या पद्धतीने आऊट होत नाहीत, तो पर्यंत आपण त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे.युवा खेळाडूंच्या खेळीने उत्साहित होणं सोपं असतं पण संघातील वरीष्ठ खेळाडूंवर भरोसा ठेवणं तितकचं महत्तवाचं असते, असे गावस्कर म्हणाले. रहाणे आणि पुजारा दोघंही अनुभवी आहेत आणि त्यांनी संघासाठी जे काही केलेआहे, त्यासाठी संघाने त्यांना समर्थन दाखवलं असून मूळात त्या दोघांनाही स्वत:वर विश्वास होता आणि त्यांनी त्यानुसारच कामगिरी केली. कधी कधी सीनियर खेळडूंचा चांगला खेळ पाहण्यासाठी त्यांच्याप्रति कठोर व्हावं लागतं. तसंच एकदाका ते चांगलं खेळू लागले की त्यांच्यावर भरोसा दाखवणं तितकचं गरजेचं आहे, असेही ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …