रणजी ट्रॉफी स्पर्धा स्थगित

मुंबई – देशभरामध्येकोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्यामुळे भारताची सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धाअसलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. 13 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीच्या मोसमाला सुरूवात होणार होती. याआधी 2021 सालचा रणजी मोसमही कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता, तर 2020 सालचा मोसमही अर्धवटच स्थगित करण्यात आला होता. बीसीसीआयनेऑनलाईन बैठक घेऊन रणजी ट्रॉफी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
रणजी ट्रॉफीशिवाय कर्नल सीके नायुडू ट्रॉफी, महिला टी-२० लीगही पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयला खेळाडू आणि सहकाऱ्यांच्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती बघून या स्पर्धा कधी खेळवायच्या, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे. रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ कोलकात्यामध्येदोन दिवसांचा सराव सामना खेळण्यासाठी दाखल झाला होता. या सामन्यानंतर संघ बायो-बबलमध्येजाणार होता, पण आता स्पर्धाच स्थगित झाल्यामुळे मुंबईचा संघ बुधवारी घरी परतली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …