बोपन्ना-रामकुमारने कोरले ॲडलेड आंतरराष्ट्रीय चषकावर नाव

मेलबर्न – भारताचे रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन जोडीसाठी नववर्षाची सुरुवात शानदार ठरली आहे. एटीपी टूरमध्ये प्रथमच उतरलेल्या रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीनेरविवारी ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या चषकावर नाव कोरले.बोपन्ना आणि रामकुमार या बीगर मानांकित जोडीनेया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकन मिळालेल्या क्रोएशियाच्या इवान डोडिग आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.१ तास २१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात बोपन्ना-रामनाथन जोडीने ७-६(६), ६-१ असा विजय मिळवला. भारतीय जोडीने चार ब्रेक पॉइंट वाचवले तसेच दोन वेळा प्रतिस्पर्ध्यांची सर्व्हिस मोडित काढली.बोपन्ना आणि रामकुमार या जोडीनेसामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. बोपन्ना आणि रामनाथन या जोडीने सुरुवातीलाच ब्रेक पॉइंट वाचवला होता. सातव्या गेममध्ये त्यांची डोडिग-मेलो जोडी ३०-० वर सर्व्हिस करत होती. त्यावेळी बोपन्नाने प्रतिस्पर्धी डोडिगच्या उजव्या बाजूला सर्व्हिस करत गुणांची कमाई केली आणि फोरहँडवर सुरेख फटका मारत ३०-३० अशी बरोबरी साधली. मात्र त्यानंतर डोडिग-मेलो जोडी सर्व्हिस वाचवण्यात यशस्वी ठरली. बोपन्नाने पुढील गेममध्ये ब्रेक पॉइंट मिळवला आणि पुन्हा एकदा सर्व्हिस राखत ४-४ अशी बरोबरी साधली. रामनाथनने त्यानंतर ५-६ अशी स्थिती असताना स्वत:ची सर्व्हिस वाचवत पहिला सेट टायब्रेकपर्यंत खेचला. बोपन्नाने ६-६ असा गुणफलक असताना मेलोची सर्व्हिस भेदत पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये बोपन्ना-रामनाथन जोडीने प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही.
बोपन्नाचे कारकीर्दीतले २० वे, तर रामनाथचे पहिले विजेतेपद आहे. रामकुमार जागतिक स्तरावर दुसऱ्यांदाच अंतिम फेरीत खेळत होता. यापूर्वीरामकुमारला २०१८ मध्ये हॉल ऑफ फेम टेनिस चॅम्पियनशिपमध्येउपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बोपन्ना-रामनाथन जोडीला विजेतेपदाच्या स्वरूपात १८७०० डॉलर मिळाले आहेत तसेच प्रत्येकी २५० गुण त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
रामनाथन सर्व्हिस करत असताना तुम्ही लवकर गुण मिळवू शकता, अशा फायदेशीर स्थितीमध्ये असता. दिविज शरणसोबत खेळताना गुण मिळवण्याची संधी शोधावी लागते. निश्चित करावे लागते की पहिली व्हॉली मिळाल्यावर सत्कारणी लावता येऊ शकते का? त्या तुलनेत रामनाथन सोबत खेळताना विचार करावा लागत नाही, अशा शब्दात चषकावर नाव कोरल्यानंतर बोपन्नाने रामकुमारची तोंडभरून स्तुती केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …