चीनच्या तियानजिन प्रांतात ओमायक्रॉनचा उद्रेक
बीजिंग – चीनमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या बीजिंग शीत ऑलिम्पिकमध्ये ओमायक्रॉनच्या रूपात अडथळा निर्माण झाला आहे. कारण बीजिंगच्या शेजारील तियानजिन शहरात ओमायक्रॉनचा उद्रेक झाला आहे. तियानजिनमध्येकोरोनाचे २० आणि ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १ कोटी ४० लाख नागरिकांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.
बीजिंग आणि तियानजिन या शहरातून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. हाय स्पीड ट्रेनमुळे तर दोन्ही शहरांतील प्रवास ३० मिनिटांत पूर्ण होत आहे. त्यामुळेच ४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बींजिग ऑलिम्पिकबाबत आतापासूनच शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. तियानजिन शहरात चीनमधील पहिला ओमायक्रॉन रूग्ण डिसेंबरच्या मध्यात आढळला होता, पण त्यानंतर ओमायक्रॉनचे रूग्णांची आकडेवारी घसरली आहे. तियानजिन शहरातील शालेय विद्यार्थीसह त्यांचे कुटुंबीय आणि पाळणाघरातील सदस्यांचा ओमायक्रॉनमध्ये समावेश होतो.
जिनान जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी आढळलेल्या रूग्णांत ओमायक्रॉनची लक्षणे दिसून आली आहेत.पर्यटकांत प्रसिद्ध असलेल्या शियान आणि अन्य शहरांतही कोरोना रूग्णवाढीस लागले आहेत. ओमायक्रॉनच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढल्यास विदेशातील खेळाडू चीनमध्ये पाऊल टाकण्याअगोदर दहावेळा विचार करतील आणि त्यामुळे चीनची पुन्हा एकदा नाचक्की होण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा
सानिया, बोपन्ना पहिल्या फेरीत बाहेर
ॲडलेड -भारताचे अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांना दुसऱ्या ॲडलेड एटीपी आणि डब्ल्यूटीए …