फटका मारण्याची वेळ आणि परिस्थितीवर पंतशी चर्चाकरू – द्रविड

मुंबई – भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळत गत वर्षाला विजयीनिरोप दिला होता, परंतु २०२२ या वर्षाच्या सुरुवात पराभवाने झाली आहे. जोहान्सबर्गयेथे रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला पराभूत केले. टीम इंडियाला दोन्ही इनिंगमध्येमोठा स्कोअर करता आला नाही. टीम इंडियाच्या या पराभवानंतर ऋषभ पंतच्या खेळावर टीका होत आहे. पंत दुसऱ्या इनिंगमध्ये टीमला गरज होती, त्यावेळी बेजबाबदार फटका मारून आऊट झाला होता. आता पंतच्या खेळावर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडने मोठे वक्तव्य केले आहे.
ऋषभ पंत जोहान्सबर्गकसोटीमध्ये तिसऱ्या दिवशी बॅटींगला उतरला त्यावेळी भारताची अवस्था ४ बाद १६३ अशी होती. पुजारा आणि रहाणेही अनुभवी जोडी बाद झाली होती. त्यावेळी भारताला भागिदारी गरज होती. पंतने परिस्थितीचेभान ओळखून संयमी सुरूवात करणेआवश्यक होते. पण, तो बेजाबदार फटका मारून आऊट झाला. पंतची ही चूक टीम इंडियावर भारी पडली.
राहुल द्रविडनं मॅचनंतर पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना सांगितले की, ऋषभ सकारात्मक खेळतो आणि खास पद्धतीने बॅटींग करतो हे आपल्याला माहिती आहे. या पद्धतीने बॅटींग करून त्याला यश देखील मिळाले आहे. पण, आम्ही नक्कीच पंतशी चर्चा करू. त्या पद्धतीचा फटका मारण्याची वेळ आणि मॅचमधील परिस्थितीवर ही चर्चा होईल. कुणीही ऋषभ पंतला तू आक्रमक किंवा सकारात्मक खेळू नकोस हा सल्ला देणार नाही. पण, कधी-कधी या पद्धतीने खेळण्यासाठी वेळेचे भान जपणे आवश्यक असते. माझ्या मते मैदानात गेल्यावर थोडा वेळ तिथं खेळून काढणे अधिक योग्य आहे, पण ऋषभमुळे टीमचा फायदा काय होतो हे सर्वांना माहिती आहे. तो आमच्यासाठी काही वेळात मॅचचं चित्र बदलू शकतो. त्याला नैसर्गिक खेळाला मुरड घालून वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा सल्ला देता येत नाही. पण, एक फलंदाज म्हणून प्रतिस्पर्धी टीमवर आक्रमक खेळ कधी करायचा हे समजणेआवश्यक आहे, असे द्रविडने स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …