पुरुषांमध्येमुंबई उपनगर, ठाणे, सांगली व पुणे, तर महिलांमध्येपुणे, उस्मानाबाद, रत्नागिरी व ठाणेसंघ उपांत्य फेरीत
मुंबई- महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अम्याचूर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथील पालखी मैदानावर सुरू आहे. पुरुषांमध्येमुंबई उपनगर, ठाणे, सांगली व पुणे, तर महिलांमध्येपुणे, उस्मानाबाद, रत्नागिरी व ठाणेसंघ उपांत्य फेरीत धडक मारली आहे.उपांत्य फेरीत पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. ठाणे व सांगली वि. पुणे तर महिलांमध्ये पुणे वि. उस्मानाबाद व रत्नागिरी वि. ठाणेहे संघ एकमेकांना भिडणार आहेत.
वेळापूरच्या पालखी मैदानावर महिला गटात उस्मानाबादनेसातारावर १३-८ असा डावाने दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या वैभवी गायकवाडने आपल्या धारदार आक्रमणात ५ गडी टिपले. आश्विनी शिंदे( ४.००, १.३० मि. संरक्षण), नम्रता गाडे (२.३० मि. संरक्षण) व किरण शिंदे(२.०० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळी केली. साताराच्या मयुरी जाधवने एक मिनिटे पळतीचा खेळ केला तर संचिता बोडरे हीने दोन बळी टिपले. दुसऱ्या सामन्यात पुण्याने सोलापूरला १०-७ असेडावाने हरविले. पुण्याच्या प्रियंका इंगळेने(३.२० मि. संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू खेळी केली. प्रिया भोर हीनेनाबाद तीन मि. संरक्षण तर कोमल दारवाटकर हीने ३.१० मि. पळती केली. सोलापूरच्या प्रीती काळे (१.४० मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (१.२०, १.४० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले व त्यांना मोठ्या परभवाला सामोरेजावे लागले. अन्य सामन्यात रेश्मा राठोडच्या (३.१० मि. संरक्षण व २गुण) अष्टपैलू खेळामुळे ठाणे जिल्ह्याने मुंबई उपनगरला १०-८ असे डावाने नमविले. रत्नागिरीने सांगलीस १५-१२ असे पराभूत केले. मध्यंतरची १०-६ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. अष्टपैलू कामगिरी करणारी अपेक्षा सुतार (२.५०, १.५० मि. संरक्षण व ४ गुण) व आरती कांबळे ( १.३०, १.३० मि. संरक्षण व ४गुण) हे त्यांच्या विजयाचेशिल्पकार ठरले.
पुरुष गटात अरुण गुनकीच्या (१.३०, २.०० मि. संरक्षण व ४गुण) अष्टपैलू कामगिरीमुळे सांगलीने यजमान सोलापूरचा १८-१६ असा डावाने पराभव केला. सोलापूरकडून रामजी कश्यप, राहुल सावंत, अक्षय इंगळे, विनीत दिनकर यांनी प्रत्येकी ३ गडी टिपले. दुसऱ्या सामन्यात पुण्याने उस्मानाबादवर १७-११ अशी डावाने एकतर्फी मात केली. त्यांच्या मिलिंद करपे याने पाच गडी बाद केले. राहूल मंडलने २.२० मि. संरक्षण व अभिषेक खेंडेकर २.०० मिनिटे पळती केली. अन्य सामन्यात ठाण्याने मुंबईवर १८-१७ असा ३.४० मिनिटेराखून विजय मिळविला. त्यांच्या लक्ष्मण गवस व शुभम उत्तेकर यांनी प्रत्येकी तीन गडी टिपले. हर्षद हातणकरच्या (१.००, १.२० मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळामुळे मुंबईउपनगरनेअहमदनगरला १५-१३ असे ७.३० मिनिटे राखून हरविले. अहमदनगरच्या आकाश ढोले (१.४० मिनिटे व ३गुण) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.
अवश्य वाचा
सौरव गांगुलींच्या तब्येतीत सुधारणा
कोलकाता – कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागलेले बीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलींच्या प्रकृतीत …