पंतच्या बेजबाबदार खेळीवर गावसकर चांगलेच भडकले

जोहान्सबर्ग- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा (५३) आणि अजिंक्य रहाणे(५८) यांनी अर्धशतक साजरे करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. रहाणेआणि पुजारा बाद झाल्यानंतर ऋषभ पंत बॅटिंगला आला, पण तो ३ चेंडूंचा सामना करून खातेही न खोलताच तंबूत परतला. ऋषभ पंतने मारलेला खराब शॉट पाहून लाईव्ह कॉमेंट्री करणारे सुनिल गावसकर चांगलेच भडकले. ऋषभ पंतने बेजबाबदार शॉट मारला, तो अजिबात लढला नाही. या शॉटसाठी कोणतीही कारणेनकोत. हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे, हे तर मूर्खपणाचे कारण आहे. पुजारा आणि रहाणेबाद झाल्यानंतर टीम अडचणीत होती. अशा परिस्थितीत पंतनेजबाबदारी दाखवायला पाहिजेहोती, आता तर अनुभवाची कमी नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.  गेल्या काही काळापासून रहाणेआणि पुजारा या दोघांची कामगिरी निराशाजनक राहिली होती, तसंच त्यांना टीममधून बाहेर काढण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. एकीकडे पुजारा आणि रहाणेच्या खराब कामगिरीवर टीका होत असली, तरी पंतही मैदानात संघर्ष करत आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दोन्ही डावामध्येही त्याचा संघर्ष असाच कायम राहिला. अहमदाबाद कसोटीमध्ये पंतने शतक २०२१ साली इंग्लंडविरुद्ध केले होते. या शतकानंतर पंतने१३ डाव खेळले, यात त्याने एका अर्धशतक पूर्ण करता आले.या दरम्यान त्याची सरासरीही फक्त १९.२३ ची आहे. ऋषभ पंतने १३ डावामध्ये ४, ४१, २५, ३७, २२, २, १, ९, ५०, ८, ३४, १७, ० असे स्कोअर केले आहेत. पंतसाठी २०२१ सालची सुरूवात चांगली झाली होती. ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकवण्यामध्ये पंतची भूमिका मोलाची होती. सिडनी टेस्टच्या अखेरच्या इनिंगमध्ये त्याने९७ धावा करून मॅच ड्रॉ केली होती, तर ब्रिस्बेनमध्ये नाबाद ८९ धावा करून पंतने भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्येही पंतने त्याचा फॉर्म कायम ठेवला, पण त्यानंतर पंतचा संघर्ष सुरू झाला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …