न्यूझीलंडची दमदार सुरुवात: पहिला दिवसअखेर १ बाद ३४९ धावा

लॅथमचे नाबाद शतक , तर डेवोन कॉनवे नाबाद ९९
ख्राइस्टचर्च- न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी सुरू आहे. पहिल्या टेस्टमध्ये अनपेक्षित पराभव सहन कराव्या लागलेल्या यजमान न्यूझीलंडनं दुसऱ्या टेस्टमध्ये जोरदार सुरूवात केली आहे. कर्णधार टॉम लॅथमच्या धडाकेबाज (नाबाद १८६) शतक आणि डेवोन कॉनवेच्या नाबाद ९९ तसेच सलामीवीर विल यंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान न्युझीलंडने पहिला दिवसअखेर १ गडी गमावत ३४९ धावा केल्या. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमचे दमदार शतक हे या दिवसाचेवैशिष्ट्य ठरले.
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यजमान संघाचे सलामीवीर कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग या जोडीने आक्रमक सुरुवात करत पाहुण्या संघाचा निर्णय चुकीचा ठरवला.या जोडीने१४८ धावांची सलामी दिल्यानंतर शोरिफुल इस्लामनेयंगला बाद करून जोडी फोडली.यात यंगने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. विल यंग बाद झाल्यानंतर लॅथमनेडेवोन कॉनवेच्या साथीने आक्रमन चालूच ठेवत दुसऱ्या गड्यासाठी नाबाद २०१ धावांची भागीदारी उभारली.लॅथमनं शतकाच्या नंतरही धडाका सुरूच ठेवला. दिवसाच्या अखेरीस तो १८६ धावांवर नाबाद आहे. कसोटीमध्ये पदार्पण केल्यापासून जबरदस्त फॉर्मात असलेला डेवॉन कॉनवे९९ धावांवर नाबाद आहे. कॉनवेने पहिल्या कसोटीमध्येही शतक झळकावले होते. लॅथमने आक्रमक खेळ करत मर्यादित क्रिकेटच्या स्टाईलने१३३ चेंडूंमध्ये शतक झळकावले. लॅथमने तीन वर्षांनी कसोटी कारकिर्दीमध्ये शतक झळकावले आहे. त्याने यापूर्वी २०१९ साली शतक झळकाले होते. लॅथमच्या कारकिर्दीमधील हे सर्वात जलद शतक आहे. हे त्याचे १२ कसोटी शतक असून तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारा सलामीवीर बनला आहे. त्याने यावेळी न्यूझीलंडचे दिग्गज क्रिकेटपटू जॉन राईट यांची बरोबरी केली आहे. दरम्यान, विश्व कसोटी चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंडला या सिझनमध्ये कमाल करता आलेली नाही. भारताविरुद्धची सीरिज गमावल्यानंतर बांगलादेशनं त्यांचा पहिल्या टेस्टमध्ये पराभव केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …