दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिका विजयी


जोहान्सबर्ग- जलदगती गोलंदाज कासिगो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को जॅन्सेन यांच्या भेदक मारा, तर कर्णधार डीन एल्गारच्या सयंमी नाबाद ९६ धावांच्या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनेदुसरा कसोटी सामना ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह यजमान आफ्रिकेने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसातील पहिले दोन सत्रांचा खेळ पावसामुळे वाया गेला. चहापाण्यानंतर पावसाने विसांत घेतल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. भारतानेविजयासाठी ठेवलेल्या २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेनेतिसऱ्या दिवसअखेर २ बाद ११८ धावा केल्या होत्या. डीन एल्गर व रॅसी व्हॅन डेर ड्युसेनं हे खेळपट्टीवर ठाण मांडून होते. त्यावेळी कर्णधार एल्गर (४६) तर रुसी व्हॅन डर ड्युसेन ११ धावांवर खेळत होते. चौथ्या दिवशी आफ्रिकेला विजयासाठी अजून १२२ धावांची गरज होती. कर्णधार डीन एल्गर आणि रुसी व्हॅन डर ड्युसेन यांनी आजही आक्रमक सुरुवात केली. ही जोडी खेळपट्टीवर स्थिरावल्याचेदिसत असतानाच शमीने डुसेनला बाद करत जोडी फोडली. या जोडीने ८२ धावांची भागीदारी रचली.डुसेन बाद झाल्यानंतर एल्गरनेबावुमाला मदतीला घेत आपले आक्रमन चालू ठेवत विजयाला गवसणी घातली. यात त्याने१८८ चेंडूंचा सामना करत नाबाद ९६ धावांची कर्णधारी खेळी केली, तर बावुमानेही नाबाद २३ धावा केल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …