दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांची गरज

* तिसरा दिवसअखेर आफ्रिका २ बाद ११८ धावा
* रहाणे-पुजाराची अर्धशतके, विहारीची चिवट खेळी

जोहन्सबर्ग – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसास कसोटी सामना रंगत स्थितीत आला आहे.या सामन्याच्या दुसऱ्या डावात रहाणे-पुजाराची अर्धशतकेआणि विहारीची चिवट खेळी जोरावर भारतीय संघाने यजमान आफ्रिका संघापुढे विजयासाठी २४० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेनेतिसऱ्या दिवसअखेर २गडी गमावत ११८ धावा केल्या.तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे, तर दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान ठेवलेआहे. भारताने दुसऱ्या डावात २६६ धावा करत विजयासाठी २४० धावांचेआव्हान ठेवलेआहे. भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्क्रम आणि कर्णधार एल्गर यांनी आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु शार्दुलने जोडी फोडत पहिला धक्का दिला. मार्क्रमने ३१ धावा केल्या.त्यानंतर पीटरसन आणि एल्गर या जोडीनेही भारतीय आक्रमन परतावून लावत अर्धशतकी भागिदारी रचली.ही जोडी स्थिरावली असे दिसत असतानाच आर. अश्विननेपीटरसनला पायचित करत दुसरा धक्का दिला. दोन गडी बाद झाल्यानंतरही एल्गरने वॉन डर डुसनच्या मदतीनेकिल्ला लढवला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, आफ्रिकेने २ गडी गमावत ११८ धावा केल्या. आफ्रिका विजयापासवून अद्याप १२२ धावा दूर आहे.एल्गर ४६, तर डुसन नाबाद ११ धावांवर खेळत आहेत.
भारतानेदुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा २ गडी गमवून ८५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा अजिंक्य रहाणेआणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. चेतेश्वर पुजाराला दुसऱ्या डावात अखेर सूर गवसला. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे ३२ वं अर्धशतक आहे. त्यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेनेअर्धशतकी खेळी केली. या दोघांनी शतकी भागीदारी केली आहे. या दोघांची भागीदारी फोडण्यात कागिसो रबाडाला यश आले. अजिंक्य रहाणेआणि चेतेश्वर पुजारा त्याच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. तीन चेंडू खेळून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र लुंगी एनगिडीनेअश्विनचा अडसर दूर केला.अश्विन १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकुरने झटपट खेळी करत २४ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत त्याने५ चौकार आणि १ षटकार ठोकला, मात्र मार्को जॅनसेनच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद शमी खातंही खोलू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या रुपानेभारताना नववा धक्का बसला आहे. जसप्रती बुमराहने १४ चेंडूत ७ धावा केल्या. यात एका षटकाराचा समावेश आहे. तर तळातील फलंदाजाच्या मदतीनेहनुमा विहारी चिवट खेळी करत नाबाद ४० धावा केल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …