तिसऱ्या कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेनेदिला टीम इंडियाला इशारा

मुंबई- दक्षिण आफ्रिकेनेटीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीमध्ये पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. भारतीय संघाने सेंच्युरियनमधील पहिली कसोटी ११३ धावांनी जिंकली होती. त्यानतर आफ्रिकेनं मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळेकेपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामना अटीतटीचा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.यातच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर जोशात आहे. त्याने टीम इंडियाला केपटाऊन टेस्टपूर्वी इशारा दिला आहे. आम्ही योग्य दिशेने सकारात्मक पाऊल उचललेआहे. आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. त्यामध्ये मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीचाही समावेश आहे. या टेस्टमध्ये वेगळेच आव्हान असेल. खेळाडू याचा कसा सामना करतात हेमहत्त्वाचे आहे. आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. आमच्या अनेक खेळाडूंचा यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. आमच्या टीममध्येअनुभवाची कमतरता आहे. सर्व गोष्टी आमच्या बाजूने नसतील याची देखील आम्हाला कल्पना आहे. आम्हाला आमच्या रणनीतीवर काम करावे लागेल. आम्ही आमच्या रणनीतीमध्ये कोणताही बदल करणार नाहीत, असा इशारा एल्गारने टीम इंडियाला दिला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …