तिसऱ्या कसोटीत कोहली खेळण्याचे द्रविडचे संकेत

जोहान्सबर्ग – भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पाठदुखीच्या दुखापतीमधून सावरत आहे. तंदुरुस्तीची चाचपणी करण्यासाठी त्याने हलका सरावही केला. तसेच व्यायामाचे काही प्रकारही केले. एकूणच त्याच्या तयारीवरून तो सर्व दुखापतींवर मात करण्यास यशस्वी ठरला आहे, असे आशादायी चित्र दिसत आहे. या परिस्थितीत तिसऱ्या कसोटीसाठी त्याचेभारतीय संघात पुनरागमन होऊ शकते, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला.
वाँडरर्सवरील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्याला ऐनवळी सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणारा लोकेश राहुल संघाला तारू शकला नाही आणि दक्षिण आफ्रिका संघाने सात गडी राखून भारताला चितपट करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जोहान्सबर्गमधील सामना आटोपल्यावर पत्रकारांनी कोहलीच्या तंदुरुस्तीबाबत प्रशिक्षक द्रविड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, माझ्या कानावर जे काही आले आहे आणि मी स्वत: कोहलीशी बोललो आहे, त्यावरून आशा आहे की, येत्या चार दिवसांत तो तिसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त असेल. दुसऱ्या डावात २४० धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचे त्यांनी कौतुक केले.पहिल्या डावात आणखी ५०-६० धावा अधिक झाल्या पाहिजे होत्या, अशी खंत द्रविड यांनी व्यक्त केली. दुसऱ्या कसोटीत ज्या खेळाडूंचा जम बसला आहे, त्यांच्याकडून आणखी मोठ्या खेळींची अपेक्षा होती, असे अप्रत्यक्षरीत्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेचे नाव न घेता द्रविड म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …