जोकोविच अडकला कोर्ट-कचाट्यात ; परत पाठवणीबाबत निर्णय सोमवारी

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात कोरोना लसीकरणाच्या कडक नियमांवर वैद्यकीय सुटीचा मार्गकाढत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याचा दावा करणारा गतविजेता नोवाक जोकोविच मेलबर्न विमानतळावर दाखल होताच कोर्ट-कचाट्यात सापडला आहे. नियमांची पूर्तता न केल्याप्रकरणी विमानतळावर बराच काळ खोळंबा झालेल्या जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. तसेच त्याला ताब्यात घेऊन मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचा ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्याचा अंतिम निर्णय न्यायालयाने सोमवारपर्यंत प्रलंबित ठेवला आहे.
जोकोविचने १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी मेलबर्नला पोहोचला. त्यानेकोरोना लस घेतल्याचेसिद्ध केलेले नाही. त्याने लसीकरणातून वैद्यकीय सूट मिळण्यासाठी सादर केलेले पुरावे ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने नाकारत त्याचा व्हिसा रद्द केला.
दरम्यान, मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलबाहेर जोकोविचच्या समर्थकांनी आंदोलन केले. त्यात अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांचाही समावेश होता. ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने ठेवलेल्या हॉटेलमध्ये नोवाक जोकोविचनेरूढिवादी ख्रिसमस (आर्थोडॉक्स ख्रिसमस) साजरा केला.तसेच मेलबर्नयेथील होली ट्रिनिटी सर्बियाई आर्थोडॉक्स चर्चच्या एका पादरी नेसीमा सुरक्षा अधिकाऱ्यांच्या परवाणगीनेआर्थोडॉक्स ख्रिसमसच्या निमित्ताने जोकोविचची भेट घेतली. यशूंच्या जन्मदिनाची आठवण म्हणून दरवर्षी ७ जानेवारी रोजी ‘आर्थोडॉक्स ख्रिसमस’ साजरा केला जातो.

कैद्यासारखी वागणूक; आईचा आरोप
जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियात कैद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्याची आई डियाना यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला. तसेच त्याला ताब्यात घेऊन मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये ठेवले. ही वागणूक अतिशय निंदनीय आणि अयोग्य असल्याचे डियाना यांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …