जोकोविचला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाही : व्हीजा केला रद्द


मेलबर्न(ऑस्ट्रेलिया) – सध्या ऑस्ट्रेलियात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहेआणि सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर निर्बंध लादत आहे. दुसरीकडे मात्र ऑस्ट्रेलिया टेनिस संघटनेने ‘ऑस्ट्रेलिया ओपन’स्पर्धाखेळण्याचा निश्चय केला आहे.मानाच्या ग्रॅडस्लॅम स्पर्धेपैकी एक असलेली ऑस्ट्रेलिया ओपन ही स्पर्धा१७ जानेवारीपासून सुरू होणार आहे, मात्र त्यापूर्वीच मोठा गदारोळ माजला आहे. जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याचा व्हिसा ऑस्ट्रेलियानेरद्द केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोवाक जोकोविच बुधवारी मेलबर्नला पोहोचला. पण त्याला विमानतळाबाहेर जाऊ दिले नाही. त्याला एक तास विमानतळावर थांबवण्यात आले, त्यानंतर प्रवेशाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर ‘कायदा सर्वांसाठी समान आहेआणि कोणीही कायद्याच्या वर नाही’, अशी प्रतिक्रीया ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हटलेआहे. यापूर्वी, टेनिस ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियन राज्य सरकारनं सांगितलं होतं की, जोकोविचसह आणखी २६ अर्जदारांनी लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता.
ऑस्ट्रेलियाहून क्रोएशियाला रवाना होण्यापूर्वीऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ९ वेळा जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचनेसांगितले की, मेडिकल कारण देत लसीकरणाचे स्टेटस सांगण्यास नकार दिला आहे. जोकोविचनं मेडिकल कारण देत व्हिसा नियमांमध्ये सूट देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडेकेली होती. एक दिवसापूर्वी त्याची ही मागणी मान्य झाल्याचा दावा त्याने केला होता.जोकोविचकडे लसीकरण प्रमाणपत्र नव्हते आणि तो त्याशिवाय स्पर्धा खेळू इच्छित होता. ३४ वर्षीय जोकोविचचे लक्ष विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅमवर आहे. जोकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या तिघांनीही आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदे पटकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जोकोविचबद्दल मोठे वक्तव्य केले होते. जोकोविचसाठी कोणताही विशेष नियम नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. जर ते सिद्ध करू शकत नसतील की, त्यांना वैद्यकीय कारणांमुळे सूट देण्यात आली आहे, तर त्यांना ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि पुढच्याच फ्लाइटनं त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं जाईल, असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. यावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे आणि सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर निर्बंध लादत आहे. बाहेरून फक्त तेच लोक देशात येऊ शकतील, ज्यांचे संपूर्ण लसीकरण झालं आहे. त्यामुळे १७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जे खेळाडू वैद्यकीय कारणांमुळे लस घेऊ शकले नाहीत, त्यांना या नियमातून सूट देण्यात येणार आहे.
बॉक्स …
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी ट्विटरवर लिहिले, जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. नियम हा नियम असतो. विशेषत: जेव्हा आपल्या सीमेचा प्रश्न येतो. या नियमांच्या वर कोणीही नाही. करोनामुळे जगातील सर्वात कमी मृत्यूदर येथे आहे. आम्ही सतत सतर्क आहोत.

सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वुसिक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात कते म्हणाले, मी जोकोविचशी फोनवर बोललो आहे आणि संपूर्ण सर्बिया त्याच्यासोबत आहे. आमचे अधिकारी जोकोविचची समस्या सोडवण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहेत. सर्बिया आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत जोकोविच, न्याय आणि सत्यासाठी लढा देईल.”

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …