मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याला कोरोनाची लागण झाली आहे. मॅक्सवेल हा बिग बॅश लीगमधील मेलबर्नस्टार्स संघाचा कर्णधार आहे. सोमवारी रात्री मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यानंतर त्याची अँटीजेन चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सध्या विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले असून त्याच्या आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मॅक्सवेलपूर्वी मेलबर्न स्टार्सचे १२ खेळाडू आणि ८ कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मेलबर्न स्टार्सला त्यांच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये प्रमुख खेळाडूंशिवाय खेळावे लागले.
यापूर्वी, ब्रिस्बेन हीट संघाच्या खेळाडूंना रॅपिड अँटीजेन चाचणी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. याच कारणामुळे बीबीएलच्या तीन सामन्यांचे वेळापत्रक शेवटच्या क्षणी बदलावे लागले. बीबीएल संघांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बिग बॅशमध्ये खेळणाऱ्या आपल्या सहा खेळाडूंना ऑस्ट्रेलियातून परतण्याचे आदेश दिले होते. बीबीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या सहा खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या वेस्ट इंडिज र्दौयापूर्वी आयसोलेट होण्यासाठी लवकर घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.
अवश्य वाचा
महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण
मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …