ग्रिफिन जिमखाना, ज्ञानशक्ती , जॉयकुमार युवा प्रतष्ठिानला जेतेपद

भिवंडी – ६६व्या जल्हिा अजक्यिंपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात ग्रिफि न जिमखाना, कुमारी गटात ज्ञानशक्ती युवा, तर व्यावसायिक पुरुष गटात जॉयकुमार युवा प्रतिष्ठान यांनी जेतेपद पटकावले.
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात ग्रिफिन जिमने जय बजरंग मंडळाचा कडवा प्रतिकार ५-५ चढायांच्या डावात ४१-३५(९-३) असा मोडून काढत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात ज्ञानशक्ती युवाने ३८-२८ असे राजर्षी शाहू महाराज संघाला रोखत विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या डावात १६-१३ अशी आघाडी घेणाऱ्या ग्रिफिनला दुसऱ्या डावात जय बजरंगने ३२-३२ असे बरोबरीत रोखले. यामुळे निर्णायक निकाल लावण्याकरिता ५-५ चढायांचा डाव खेळवण्यात आला. त्यात ग्रिफिनने ९-३ अशी बाजी मारली. कुमारी गटातील अंतिम सामन्यात मध्यांतराला १६-१३ अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानशक्तीने नंतरही तोच जोश कायम ठेवत हा विजय साकारला. यतीक्षा बाबडे, निधी राजोळे, मानसी गायकर, मनीषा गायकवाड या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात जॉयकुमार युवा प्रतिष्ठानने प्रिन्सकुमार अँड कंपनीला ३१-१७ असे नमवत या विभागात जेतेपदाचा मुकुट हस्तगत केला. राकेश पाटील, प्रणय राजपूत, अभिषेक भोईर यांच्या चतुरस्र खेळाच्या बळावर विश्रांतीला १८-०९ अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर तोच खेळ कायम राखत हा विजय मिळवला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …