ख्वाजाच्या शतकानेऑस्ट्रेलियाने उभारला धावांचा डोंगर

* ऑस्ट्रेलियाचा ४१६ धावांवर डाव घोषित * इंग्लंड बीनबाद १३

सिडनी – ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजानेझळकावलेल्या १३७ धावांच्या खेळीच्या जोरावर त ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद ४१६ धावांवर डाव घोषित केला.ख्वाजाचे टेस्ट करिअरमधील हे दुसरे शतक आहे. ड्रेव्हिस हेडला कोरोनाची लागण झाल्याने सिडनी टेस्टमध्ये ख्वाजाची निवड झाली होती. तो गेल्या दोन वर्षांपासून कसोटी संघा बाहेर होता. मिळालेल्या संधीचेसोनेकरत त्यानेशतक झळकावत मॅनेजमेंटची निवड योग्य ठरवली आहे. चहापानापूर्वीख्वाजाने शतक पूर्ण केले. त्याने२०११ साली याच मैदानावर अ­ॅशेस सीरिजमध्ये पदार्पण केले होते. आता दोन वर्षांनी इथे शतक झळकावलेआहे. ख्वाजाचे सिडनीच्या ग्राऊंडवरील हे दुसरे टेस्ट शतक आहे. दिवसअखेरीस प्रतिष्ठापणासाठी लढणाऱ्या इंग्लंडने हसीब हमिद (२) आणि झॅक क्रॉली (२) च्या खेळीवर बिनबाद १३ धावांपर्यंत मजल मारली.
पहिल्या दिवसाच्या ३ बाद १२६ या धावसंख्येवरुन स्मिथ आणि ख्वाजा या जोडीनेआपला डाव पुढे सुरू केला. त्यावेळी स्मिथ (६) तर ख्वाजा ४ धावांवर खेळत होते. या जोडीने दुसऱ्या दिवशी सावध खेळ करत चौथ्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ ६७ धावा करून बाद झाला. स्मिथने ३३ वेअर्धशतक झळकावत ७ हजार धावांचा टप्पा गाठला.ऑस्ट्रेलियाकडून असा विक्रम रचणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे. स्मिथ तंबूत परतल्यानंतर ख्वाजाने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत धावसंख्येत भर टाकली. त्याने यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरी (१३) सोबत सहाव्या गड्यासाठी ४३, तर कर्णधार पॅट क्युमिन्स सोबत (३४) सातव्या गड्यासाठी धावा ४६ धावा जोडल्या. तळाचे फलंदाज मिचेल स्टार्क (३४) आणि नॅथन लियोन (१६) यांची जोडी नाबाद राहिली. इंग्लंकडून वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ कापून काढला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …