कसोटी विश्वविजेत्या न्यूझीलंडला बांगलादेशचा धक्का: ८ गडी राखून विजयी

माउंट मोनगानुई (न्यूझीलंड) – बांगलादेश क्रिकेट टीमच्या इतिहासात ५ जानेवारी २०२२ हा दिवस नेहमी लक्षात ठेवला जाईल. कसोटी क्रिकेटमधील विश्वविजेत्या न्यूझीलंडला बांगलादेशनेधक्का दिला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडवर पहिल्या कसोटीत आठ विकेट्सने मात केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलेअवघ्या ४० धावांचे आव्हान बांगलादेशनेदोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. जिंकत इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) पहिल्या सिझनची विजेता असलेली न्यूझीलंडची टीम ५ वर्ष आणि १७ कसोटीनंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटी हरली आहे. इतकेच नाही तर बांगलादेशचा हा न्यूझीलंडच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारातील हा पहिलाच विजय आहे. क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये बांगलादेशला न्यूझीलंडमध्येविजय मिळवता आला नव्हता.
न्यूझीलंडनेपहिल्या डावात ३२८ धावा केल्या होत्या. तर बांगलादेशनेपहिल्या डावात ५४८ धावा उभारत न्यूझीलंडवर १३० धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशनेपहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडला दुसऱ्या डावात अवघ्या १६७ धावांमध्येगुंडाळले. पाचव्या दिवशी सकाळी न्यूझीलंडनं ५ आऊट १४७ धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. इबादत हुसेननं खेळ सुरू होताच रॉस टेलरला (४०) बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडची घसरगुंडी उडाली. न्यूझीलंडनं शेवटच्या ५ गडी फक्त १६ धावांमध्येतंबूत परतले.त्यामुळे न्यूझीलंडची दुसरा डाव १६९ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी ४० धावांचेआव्हान मिळाले. बांगलादेशचा गोलंदाज इबादत हुसेनने ४६ धावा देत न्यूझीलंडचे सहा गडी तंबूत माघारी धाडले. कसोटी क्रिकेटमधील हुसेनची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. न्यूझीलंड दौऱ्याआधी त्याने१० कसोटी सामन्यात ११ गडी बाद केले होते. हुसैनला तस्कीन अहमद आणि मेहदी हसन मिराज चांगली साथ दिली.
न्यूझीलंडने दिलेल्या माफक ४० धावांच्या पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच षटकामध्येशादमान इस्लामला (३) टीम साऊदीने बाद केले. त्यानंतर काईल जेमीसनननेनजमूल शंटो (१७) याला बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मोमीनुल हक (नाबाद १३) आणि मुशफिकूर रहीम (नाबाद ५) यांनी आणखी नुकसान होऊ न देता ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.

कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत मोठा बदल

या विजयासह बांगलादेशला कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत महत्त्वाचे 12 गुण मिळाले आहेत. गुणतालिकेत आता बांगलादेश पाचव्या स्थानी आहे. तर, भारत चौथ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया असून दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …