ओम कदमने पटकावले जेतेपद

आयआयएफएल मुंबई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई – मुंबईचा अग्रमानांकित इंडिया कॅडेट इंटरनॅशनल ओम कदमनेआयआयएफएल मुंबई जुनिअर (१३ वर्षाखालील ) बुद्धिबळ स्पर्धा ९ विजयासह जिंकली. त्याने अखेरच्या नवव्या फेरीत अन्या रॉयला पराभूत करीत ९ गुणांसह झळाळत्या मुंबई जुनिअर बुद्धिबळ चषकावर आपले नाव कोरले. या विजेतेपदासह ओमने ५० हजार रुपयांचे घसघशीत रोख पारितोषिकही पटकावले आहे. मुंबईच्या कफ परेड भागात खेळवण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत जुनिअर गटात गौरांग बागवेनेअर्जुन आदिरेड्डीला पराभूत करीत दुसऱ्या स्थानासह रोख ३० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. मानस गायकवाडने तिसरे, तर यश भराडियाने चौथे तसेच पारस भोइरला पाचव्या स्थानावर समानधान मानावे लागले. आदित्य कोळी आणि दिवीत भौमिक यांची सर्वोत्तम अनरेटेड खेळाडूम्हणून निवड करण्यात आली.
जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे ) नॉर्मनुसार आयोजित या स्पर्धेचे आयोजन मुंबई चेस स्कूलने मुंबई शहर बुद्धिबळ संघटना , महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने केले होते. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कन्या बुद्धिबळपटू म्हणून अन्या रॉयला, तर दुसऱ्या स्थानासाठी स्वस्ती झा हिची निवड करण्यात आली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …