ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दिले ३८८ धावांचे आव्हान

* दुसऱ्या डावातही ख्वाजाचेशतक

* चौथ्या दिवसअखेर इंग्लंड बीनबाद ३० धावा
सिडनी – उस्मान ख्वाजाने झळकावलेल्या सलग दुसऱ्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडपुढे३८८ धावांचे आव्हान ठेवलेआहे. प्रत्युत्तरात प्रतिष्ठा जपण्यासाठी लढणाऱ्या इंग्लंडने बिनबाद ३० अशी सावध सुरुवात केली आहे.चौथ्या दिवसअखेर सलामीवीर जॅक क्राउली (२२) आणि हसीब हमीद (८ धावा) खेळत आहेत.ऑस्ट्रेलियानेदुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित केला.सामन्याच्या पहिल्या डावातील १२२ धावांच्या आघाडीच्या जोरावर वर इंग्लंडसमोर ३८८ धावांचेसमोर ठेवले आहे.
दुसऱ्या डावात आघाडीच्या फळीतील डेव्हिड वॉर्नर (३), मार्कस हॅरिस (२७) ,मार्नस लबुछगने (२९) आणि स्टीव्हन स्मिथ (२३) धावसंख्या ८६ असताना तंबूत परतले.त्यानंतर ख्वाजा आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांनी डावाची सूत्रे हातात घेत धावसंख्येत भर घातली. पहिल्या डावातील शतकानंतर डावखुऱ्या ख्वाजानेदुसऱ्या डावातही कामगिरीत सातत्य ठेवत १० चौकार आणि २ षटकारांनी नाबाद १०१ धावांची खेळी सजवली, तर ग्रीननेही चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७४ धावांच्या खेळी केली. ख्वाजा-ग्रीन जोडीनेपाचव्या गड्यासाठी १७९ धावांची भागीदारी उभारली. ख्वाजाने शतक झळकावल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरी (०) भोपळाही फोडूशकला नाही. कॅरी बाद होताच ऑस्ट्रेलियानेदुसरा डाव २६५ धावांवर घोषित केला.
तत्पूर्वी, इंग्लंडचा दुसरा डाव सकाळच्या सत्रात ३६ धावांची भर घालून संपुष्टात आला.शतकीवीर शतकवीर बेयरस्टाने११३ धावांची खेळी ८ चौकार आणि ३ षटकारांनी सजवली.जॅक लीच (१०), स्टुअर्ट ब्रॉड (१५) आणि जेम्स अँडरसन (४) झटपट माघारी परतले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …