एटीपी टेनिस : बोपन्ना-रामकुमार उपांत्य फेरीत

सानिया-नाडिया यांचे आव्हान संपुष्टात
ॲडलेड – रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन या पुरुष दुहेरीच्या जोडीने ॲडलेड आंतरराष्ट्रीय वन एटीपी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बोपन्ना-रामकुमार यांनी अंतिम आठमधील सामन्यात बेंजामिन बोंजी व मोनॅको हुजो निस यांना एकतर्फी सामन्यात ६-१, ६-३ असे पराभूत केले.

बोपन्ना-रामकुमार या पहिल्यांदाच एकत्र खेळणाऱ्या जोडीला चांगलाच सूर गवसला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कपमध्ये ही जोडी पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसू शकते. पुढील फेरीत त्यांना चौथे मानांकन प्राप्त तोमिस्लाव बर्किच व सँटियोगो गोंजालेसचे आव्हान असेल; पण सानिया मिर्झा आणि तिची युक्रेनची जोडीदार नाडिया किचेनोक यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना ॲश्लेग बार्टी व स्टॉम सँडर्स जोडीने तीन सेटच्या सामन्यात नमवले. सानिया-नाडिया जोडीने पहिला सेट १-६ असा गमवला,मात्र दुसरा सेट ६-२ असा जिंकत त्यांनी बरोबरी साधली, मात्र अंतिम सेट ८-१० असा गमवत त्यांनी हार मानली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …