एटीपी टूर: बोपन्ना-रामकुमारची अंतिम फेरीत धडक

ॲडलेड – भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार रामकुमार रामनाथन या जोडीने दुसऱ्या मानांकित बोस्नियाचा टोमिस्लाव बर्किच आणि मॅक्सिकोचा टियागो गोंजालेज या जोडीवर मात करत ॲडलेड अंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बिगर मानांकित भारतीय जोडी नेशनिवार बर्किच आणि गोंजालेज या जोडीवर ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये मात केली.
एटीपी २५० स्पर्धेच्या चषकावर नाव कोरण्यासाठी बोपन्ना आणि रामकुमार या भारतीय जोडीला क्रोएशिया च्या इवान डोडिंग आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या अव्वल मानांकित जोडीचेआव्हान मोडीत काढावे लागणार आहे. हा समाना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे, कारण ४१ भारतीय बोपन्ना आणि प्रतिस्पर्धीडोडिंग या दोघांनी अनेकवेळा एकत्र खेळले आहेत.सप्टेंबर मध्ये रंगलेल्या यूएस ओपन स्पर्धेत बोपन्ना आणि डोडिंग ही जोडी मैदानात उतरली होती. त्यामुळे या दोघांचेकच्चे-पक्के दुवे एकमेकांना माहित आहेत.प्रथमच एकत्र खेळत असलेली बोपन्ना आणि रामकुमार या जोडीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील नॅथेनियल लेमोन्स आणि जॅक्सन विथ्रो या अमेरिकन जोडीविरूद्धचा सामना सोडला तर अन्य सर्व सामनेबोपन्ना आणि रामकुमार या जोडीनेसरळ सेटमध्ये जिंकले आहे.दरम्यान, ॲडलेड येथे संपन्न होत असलेली या स्पर्धेकडे१७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ओपन या मानांकित ग्रँडस्लॅमची पुर्व तयारी म्हणून पाहिलेजात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …