आयसीसीकडून टी-२० साठी नवेनियम लागू


धिमेषटकं टाकल्यास संघाला बसणार मोठा फटका
दुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने(आयसीसी) टी-२० क्रिकेटसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. टी-२० सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटवर दंड आकारण्याचा नियम आयसीसीनेलागू केला आहे. तसेच, सामन्यादरम्यान ड्रक्िंस इंटरव्हल घेण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. या महिन्यात वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यापासून ते लागू होतील.
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओव्हर रेटचे नियम आधीच ठरलेले आहेत. या अंतर्गत, क्षेत्ररक्षण करणारा संघ शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू निर्धारित वेळेत टाकण्यात आला पाहिजे. नवीन नियमानुसार एखादी टीम स्लो ओव्हर रेटनं बॉलिंग करत असेल तर उर्वरित ओव्हर्स त्यांचा एक कमी फिल्डर ३० यार्डाच्या बाहेर उभा राहील. सध्या ‘पॉवर प्लेनंतर ३० यार्डाच्या बाहेर ५ खेळाडू उभे राहू शकतात. मात्र नव्या नियमानुसार टीमनं चूक केली तर फक्त ४ खेळाडूच बाहेर उभे राहू शकतील.
आयसीसीच्या आणखी नियमानुसार इनिंगच्या दरम्यान अडीच मिनिटांचा वैकल्पिक ड्रिंक ब्रेक घेण्याची परवानगी टीमना देण्यात आली आहे. या ब्रेकचा निर्णय दोन्ही टीमनी मालिका सुरू होण्यापूर्वी घ्यायचा आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या टी-२० सामन्यापासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत, तर महिला क्रिकेटमध्येहेनियम १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेपासून लागू होतील.
दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डानेआयोजित केलेल्या द हंड्रेड स्पर्धेत असा नियम लागू केला होता. त्यानुसार आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही हा नियम लागू करण्यात येणार आहे. सर्व फॉरमॅटमधील क्रिकेटचा समाना वेळेत पार पडावा, या उद्देशानेहा निर्णय घेण्यात आला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …