आज जोकोविचचा फैसला

मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील विमानसंबंधी नियमानुसार एखाद्या व्यक्तीचा व्हिसा रद्द करण्यात आल्यास त्याला तीन वर्ष पुन्हा देशात घेण्यात येत नाही. तसेच तात्पुरत्या स्वरूपात व्हिसा मिळत नाही. त्यामुळे जोकोविकचे१७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया खुल्या स्पर्धेत खेळणे अनिश्चित मानले जात आहे; पण त्याने व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयास दिलेल्या आव्हानाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्वासितांसाठी उभारण्यात आलेल्या हॉटेलमध्येगेल्या चार दिवसांपासून वास्तव्य करत असलेल्या जोकोविचचा फैसला सोमवारी न्यायालया करेल. जोकोविक विरोधात याचिका दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात यावी,अशी मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित वेळेनूसार याचिका सोमवारीला सुनावणीस येईल, असे फेडरर सर्किटच्या न्यायधीशांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जोकोविकला समर्थन देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.तो वास्तव्यास असलेल्या हॉटेल बाहेर रविवारी समर्थकांनी सर्बियाचे झेंड्यांची प्रतिकृती असलेली टोपी परिधान करत नृत्य प्रकार सादर केले.
वैद्यकीय सवलतीच्य आधारावर मेलर्बनमध्ये बुधवारी रात्री दाखल झालेल्या जोकोविकला विमानतळवरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला होता.व्हिसा रद्द झाल्यामुळे त्याची रवानगी निर्वासितांच्या हॉटेलमध्ये झाली होती.जोकोविकला गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता.यामधून तो सावरला आहे.त्यामुळेच वैद्यकीय सवलत मिळवण्यास तो पात्र असल्याचा दावा जोकोविकच्या वकीलांनी न्यायालयात केला आहे.व्हिसा रद्द करण्याची ऑनलाईन सुनावणी मेलर्बनमध्ये स्थानिक वेळेनूसार सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

महिला चषकाच्या ट्रॉफीचे अनावरण

मुंबई – आगामी एएफसी आशियाई महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला स्टर्लिंग सिल्व्हर (चांदी)च्या हॉलमार्कची …